अहमदाबाद - भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा टी-२० सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगला आहे. उभय संघातील मालिका १-१ ने बरोबरीत आहे. आजचा सामना जिंकून दोन्ही संघ पाच सामन्याच्या मालिकेत आघाडी घेण्यासाठी उत्सुक आहेत. इंग्लंड कर्णधार इयॉन मॉर्गनने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ या सामन्यात प्रथम फलंदाजी करणार आहे.
दोन सामन्यांच्या विश्रांतीनंतर रोहित शर्माचे अंतिम संघात पुनरागमन झाले आहे. इशान किशन आणि रोहित आजच्या सामन्यात सलामीला उतरतील. रोहितसाठी सूर्यकुमार यादवला विश्रांती देण्यात आली आहे. पहिल्या दोन सामन्यात अपयशी ठरलेल्या के एल राहुलला आणखी एक संधी देण्यात आली आहे.
दुसरीकडे इंग्लंड संघाने आपल्या संघात एक बदल केला आहे. दुखापतीतून सावरलेला मार्क वूडची संघात वापसी झाली आहे. तर टॉम करन संघाबाहेर गेला आहे.
विनाप्रेक्षक खेळवण्यात येत आहे सामना...
अहमदाबादसह गुजरातमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे गुजरात क्रिकेट असोसिएशनने उभय संघातील उर्वरित सामने विनाप्रेक्षक खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, आजचा सामना विनाप्रेक्षक होत आहे.
- भारतीय संघ -
- इशान किशन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली (कर्णधार), ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर आणि भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल.
- इंग्लंडचा संघ -
- जेसन रॉय, जोस बटलर, डेविड मलान, जॉन बेअरस्टो, इयॉन मॉर्गन (कर्णधार), बेन स्टोक्स, सॅम करन, जोफ्रा आर्चर, ख्रिस जॉर्डन, आदिल राशिद आणि मार्क वूड.
हेही वाचा - टी-२० च्या आपल्या पहिल्या डावात अर्धशतक झळकावणारे ४ भारतीय, जाणून घ्या...
हेही वाचा - किशन-पंत मॅच विनर; ते भारताकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळतील