कोलकाता - ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यासाठी भारतीय संघ कोलकातामध्ये दाखल झाला आहे. भारत-बांगलादेश संघात २२ नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या या सामन्यात चांगली कामगिरी करण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक आहेत. पहिल्या कसोटीत एक डाव १३० धावांनी पराभूत झाल्यानंतर बांगलादेशच्या संघ दुसऱ्या कसोटीत कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
भारतीय कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे दोघेही आज सकाळीच १० वाजण्याच्या सुमारास कोलकातामध्ये दाखल झाले होते. त्यानंतर इतर खेळाडू आज दुपारी कोलकातामध्ये पोहोचले आहेत. रोहित शर्मा, मोहम्मद शमी आणि उमेश यादव हे तिघे मात्र, बुधवारी कोलकाताला पोहोचणार आहेत.
-
#TeamIndia have arrived here in Kolkata for the #PinkBallTest#INDvBAN pic.twitter.com/fAoCdBM306
— BCCI (@BCCI) November 19, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#TeamIndia have arrived here in Kolkata for the #PinkBallTest#INDvBAN pic.twitter.com/fAoCdBM306
— BCCI (@BCCI) November 19, 2019#TeamIndia have arrived here in Kolkata for the #PinkBallTest#INDvBAN pic.twitter.com/fAoCdBM306
— BCCI (@BCCI) November 19, 2019
भारत-बांगलादेश संघात दोन कसोटी सामन्यांची कसोटी मालिका सुरू असून मालिकेतील पहिला सामना जिंकून भारतीय संघाने १-० अशी आघाडी घेतली आहे. इंदूर कसोटीत भारतीय खेळाडूंनी सर्वच आघाड्यावर दमदार कामगिरी केली. याच प्रदर्शनामुळे भारतीय संघाने हा सामना १ डाव १३० धावांनी जिंकला.
मयांकसह भारतीय फलंदाजी सद्या फुल्ल फॉर्मात आहे. तर गोलंदाजीत वेगवान माऱ्यासह फिरकी माराही प्रभावी ठरला आहे. यामुळे ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटीतही भारतीय संघाचे पारडे जड मानले जात आहे.
हेही वाचा - Ind Vs Wi : २१ नोव्हेंबरला टीम इंडियाची घोषणा, रोहित शर्माची जागा 'हा' खेळाडू घेणार
हेही वाचा - भाऊ...पारंपरिक कसोटी आणि दिवस-रात्र कसोटी यात काय फरक आहे