ETV Bharat / sports

IND vs AUS 2nd ODI : एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाचा बोलबाला, दुसरा सामनाही जिंकला - भारत वि. ऑस्ट्रेलिया मॅच न्यूज

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ५० षटकात ४ बाद ३८९ धावांचा डोंगर उभारला. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला ५० षटकात ९ बाद ३३८ धावांपर्यंत मजल मारता आली.

india vs australia second odi match 2020
IND vs AUS 2nd ODI
author img

By

Published : Nov 29, 2020, 10:04 AM IST

Updated : Nov 29, 2020, 5:38 PM IST

सिडनी - भारताविरुद्ध रंगलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने ५१ धावांनी विजय मिळवत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाच्या ३९० धावांचे आव्हान भारताला पेलवले नाही. विराट कोहली, लोकेश राहुल यांनी झुंज दिली असली, तरी त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले. मालिकेत ऑस्ट्रेलियासाठी सलग दुसरे शतक ठोकणाऱ्या स्टीव्ह स्मिथला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ५० षटकात ४ बाद ३८९ धावांचा डोंगर उभारला. स्टीव्ह स्मिथने आपला झंझावाती फॉर्म कायम राखत सलग दुसऱ्या शतकाला गवसणी घातली. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने चांगली सुरुवात केली. मयंक अग्रवाल आणि शिखर धवन यांनी ५८ धावांची सलामी दिली. जोश हेझलवुडने शिखर धवनला ३० धावांवर बाद करत पहिला धक्का दिला. दोन धावांच्या अंतराने मयंकही (२८) बाद झाला. त्याला कमिन्सने अ‌ॅलेक्स कॅरीकरवी झेलबाद केले.

विराट-राहुलचे प्रयत्न व्यर्थ -

त्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी संघाची धावगती वाढवली. हे दोघे मोठी भागिदारी करणार असे वाटताना मोइसेस हेन्रिक्सने अय्यरला ३८ धावांवर बाद केले. त्यानंतर विराटने लोकेश राहुलला हाताशी घेत आव्हानाकडे कूच केली. शतकाला अकरा धावा बाकी असताना विराट बाद झाला. त्याने आपल्या खेळीत ७ चौकार आणि २ षटकार ठोकले. त्याला जोश हेझलवुडने बाद केले. तर, लोकेश राहुलने ४ चौकार आणि ५ षटकारांसह ७६ धावांची खेळी केली. मोठा फटका खेळण्याच्या नादात राहुल झम्पाच्या गोलंदाजीवर बाद झाला. या दोघानंतर हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजाने झुंज दिली. मात्र, चेंडू आणि आवश्यक धावांचे अंतर वाढल्याने भारताला पराभव पत्करावा लागला. यजमान संघाकडून पॅट कमिन्सला ६७ धावांत ३, हेझलवुड आणि झम्पा यांनी प्रत्येकी २ आणि हेन्रिक्स आणि मॅक्सवेल यांना प्रत्येकी एक बळी घेता आला.

वॉर्नर-फिंचची यशस्वी सुरुवात -

प्रथम फलंदाजी करताना डेव्हिड वॉर्नर आणि कर्णधार आरोन फिंच या दोन्ही सलामीवीरांनी ऑस्ट्रेलियासाठी यशस्वी सलामी दिली. भारताचे गोलंदाज पुन्हा एकदा पॉवरप्लेमध्ये विकेट घेण्यात असमर्थ ठरले. पॉवरप्लेच्या १० षटकात ऑस्ट्रेलियाने ५९ धावा केल्या. वॉर्नर-फिंचने १४२ धावांची सलामी दिली. वॉर्नरने ७ चौकार आणि ३ षटकारांसह ८३ तर, फिंचने ६ चौकार आणि एका षटकारासह ६० धावा केल्या. मोहम्मद शमीने फिंचला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. थोड्या अंतराने वॉर्नरही धावबाद होऊन तंबूत परतला.

स्मिथचा झंझावात -

सलामी जोडीने आपले काम केल्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन यांनी भारतीय गोलंदाजांची पिसे काढली. स्मिथने आक्रमक तर लाबुशेनने संयमी डाव खेळत भारताच्या गोलंदाजांना अक्षरश: थकवले. स्मिथने आपली लय कामय राखत ६४ चेंडूत १०४ धावा ठोकल्या. त्याने १४ चौकार आणि २ षटकारांची आतषबाजी केली. तर, लाबुशेनने ५ चौकारांसह ७० धावा केल्या. स्मिथ बाद झाल्यानंतर ग्लेन मॅक्सवेल मैदानावर आला. त्याने केवळ २९ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ६३ धावा चोपल्या. त्याच्या वादळी खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला चारशेच्या जवळ पोहोचता आले.

थकलेले भारतीय गोलंदाज -

भारताच्या गोलंदाजांनी पहिल्या सामन्यात केलेल्या सुमार कामगिरीचा कित्ता या सामन्यातही गिरवला. बळींच्या शोधात असलेल्या विराटने गोलंदाजांचे सात पर्याय वापरले. सलामीवीर फलंदाज मयंक अग्रवाल आणि हार्दिक पांड्यानेही गोलंदाजी केली. मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी ६५पेक्षा अधिक धावा दिल्या. शमी, बुमराह आणि पांड्याला प्रत्येकी एक बळी घेता आला. उभय संघातील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना कॅनबेरा येथे २ डिसेंबरला खेळवण्यात येईल.

हेही वाचा - लढवय्या स्टीव्ह स्मिथची भारताविरुद्ध हॅट्ट्रिक

Last Updated : Nov 29, 2020, 5:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.