मेलबर्न - बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय संघासाठी आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. रोहित शर्मा आज (बुधवार) संघासोबत जोडला गेला आहे. बीसीसीआयने एक व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली.
रोहित शर्मा दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियात उशिरा दाखल झाला होता. ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यानंतर त्याला नियमाप्रमाणे क्वारंटाइन व्हावे लागले. क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर रोहित संघासोबत जोडला गेला.
बीसीसीआयने व्हिडिओ शेअर केला आहे. यात रोहित संघातील खेळाडूंसोबत गळाभेट घेताना पाहायला मिळत आहे. भारतीय संघातील खेळाडू जेवणाचा आनंद घेत होते. तेव्हा रोहित शर्मा तिथे दाखल झाला. त्याने सर्व खेळाडूंची गळाभेट घेतली. यावेळी साऱ्यांच्याच चेहऱ्यावर हसू दिसून आले. व्हिडिओच्या शेवटी रोहित प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याशी चर्चा देखील करताना पाहायला मिळाला.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दरम्यान, तिसऱ्या कसोटीत रोहित संघात असेल की नसेल याबाबत अद्याप अधिकृत सांगण्यात आलेले नाही. पण प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी, रोहितशी चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले आहे. उभय संघातील तिसरा सामना सिडनीमध्ये होणार आहे. ७ जानेवारीपासून या सामन्याला सुरूवात होणार आहे.
हेही वाचा - डेव्हिड वॉर्नरची ऑस्ट्रेलिया संघात वापसी; जो बर्न्सला वगळलं
हेही वाचा - भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांचा अपघात