ETV Bharat / sports

टीम इंडिया बांगलादेश विरुध्द खेळणार पहिला दिवस-रात्र कसोटी सामना? - भारत विरुध्द बांगलादेश

बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. भारत-बांगलादेश संघातील या दौऱ्यात दोन कसोटी सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर दिवस-रात्र खेळवण्यात येणार असल्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बांगलादेश क्रिकेट मंडळासमोर (बीसीबी) तसा प्रस्ताव ठेवला आहे. जर खेळाडूंनी होकार दर्शवला तर भारतात पहिल्यांदाच दिवस-रात्र कसोटी सामना खेळला जाऊ शकतो.

टीम इंडिया खेळणार दिवस-रात्र कसोटी सामना?
author img

By

Published : Oct 28, 2019, 12:57 PM IST

कोलकाता - बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. भारत-बांगलादेश संघातील या दौऱ्यात दोन कसोटी सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर दिवस-रात्र खेळवण्यात येणार असल्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बांगलादेश क्रिकेट मंडळासमोर (बीसीबी) तसा प्रस्ताव ठेवला आहे. जर खेळाडूंनी होकार दर्शवला तर भारतात पहिल्यांदाच दिवस-रात्र कसोटी सामना खेळला जाऊ शकतो.

काही दिवसांपूर्वी बीसीसीआयचे नवनिर्वाचित अध्यक्ष सौरव गांगुली यांनी भारताचा कर्णधार दिवस-रात्री कसोटीसाठी तयार असल्याचे सांगितले होते. मात्र, बांगलादेश दौऱयातच पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळवण्यात येईल, याबद्दल गांगुलींनी कोणतेही भाष्य केलेले नव्हते. पण गांगुली हे दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी नेहमीच उत्सुक पहायला मिळाले आहेत. दरम्यान, बीसीसीआयने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला यासंदर्भात प्रस्ताव पाठवला आहे.

बीसीसीआयच्या या प्रस्तावावर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने विचारविनिमय सुरू केले आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे. बीसीसीआयचे दोन-तीन दिवसांपूर्वी याविषयीचे पत्र आम्हाला मिळाले आहे. त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल. खेळाडू आणि संघ व्यवस्थापनाशी चर्चा केल्यानंतरच याविषयी निर्णय घेण्यात येईल. असे बीसीबीचे क्रिकेट संचालक अध्यक्ष अक्रम खान यांनी सांगितले.

भारत-बांगलादेश या दौऱ्यातील पहिला कसोटी सामना १४ नोव्हेंबरपासून इंदूर येथे तर दुसरा कसोटी सामना २२ नोव्हेंबरपासून ईडन गार्डन्सवर होणार आहे.

हेही वाचा - Happy Diwali : भारतीय क्रिकेटपटूंसह विदेशी खेळाडूंनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

हेही वाचा - बांगलादेशच्या 'या' अनुभवी खेळाडूने घेतली भारत दौऱ्यातून माघार

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.