कराची - पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचे भारतासोबत खास कनेक्शन आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अनेक भारतीय क्रीडा वाहिन्यांवर विश्लेषक आणि समालोचक म्हणून काम करत होता. त्याने भारत एक चांगला देश असून तो पाकिस्तानसोबत युद्ध करु इच्छित नाही, असे मत व्यक्त केले आहे. यासोबतच भारतीय प्रत्येकाचं स्वागत मोठ्या उत्सुकतेने करतात, असेही त्याने सांगितले.
अख्तरने पाकिस्तानच्या एका चॅट शो दरम्यान सांगितलं की, 'भारत एक चांगला देश आहे. भारताचे लोकंही चांगली आहेत. भारताच्या लोकांना पाकिस्तानसोबत युद्ध हवं आहे, असे मला कधीही वाटले नाही. मात्र ज्यावेळी मी भारतीय वाहिन्यांवरील कार्यक्रम पाहतो, त्यावेळी मला असे वाटते की, उद्यापासून दोन्ही देशांत युद्ध होणार आहे. मी अनेक वेळा भारतात गेलो आहे. अनेक शहरांमध्ये फिरलो आहे. यामुळे मी खात्रीने सांगू शकतो की, पाकिस्तानसोबत काम करण्यासाठी भारतीय लोक उतावळे आहेत. भारताच्या विकासाचा रस्ता पाकिस्तानातूनच जातो.'
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
कोरोना विषाणूमुळे भारतातील आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. याविषयावर शोएब म्हणाला, 'भारताचे यामुळे मोठे नुकसान झाले आहे. मला वाटतं की भारताचे नुकसान होऊ नये. भारताची भरभराटी व्हावी. पण जे काही घडत आहे, ते दुर्भाग्यपूर्ण आहे.'
दरम्यान, याआधी शोएबने आपल्या यूट्यूब चॅनलवर एका व्हिडिओच्या माध्यमातून कोरोनासाठी चीनला जबाबदार धरले होते. तुम्ही लोकं, कुत्रे-मांजर-वटवाघुळं कशी खाऊ शकता असा प्रश्न शोएबने विचारला होता.
हेही वाचा - हिटमॅन रोहितने कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सांगितला उपाय; डॉक्टर, नर्सचे मानले आभार
हेही वाचा - सचिनने आजच्या दिवशीच पूर्ण केलं होतं शतकाचे 'महाशतक'; पाहा 'त्या' शतकी खेळीचा व्हिडिओ