नवी दिल्ली - फिरकीपटू शाहबाझ नदीमने केलेल्या अप्रतिम गोलंदाजीमुळे भारत ‘अ’ संघाला वेस्ट इंडिजवर सहा गडी राखून विजय मिळवता आला. हा सामना टीम इंडियाने चौथ्या दिवशीच खिशात घातला.
फिरकीपटू नदीमने ४७ धावांत घेतलेल्या ५ बळींमुळे वेस्ट इंडिज ‘अ’ संघाचा दुसरा डाव १८० धावांवर आटोपला. त्यानंतर भारताला ९७ धावांचे लक्ष्य मिळाले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना आज भारताचा डाव एक बाद २९ धावंख्येवरून सुरु झाला. लक्ष्य सोपे वाटत असताना भारताने तीन फलंदाज गमावले. त्यानंतर कर्णधार हनुमा विहारी (१९) आणि श्रीकार भरत (२८) यांनी केलेल्या ४९ धावांच्या भागीदारीमुळे संघाला विजय मिळवता आला.
तत्पूर्वी, पहिल्या डावात वेस्ट इंडिजच्या संघाने २२८ धावा केल्या होत्या. त्यानंतर शिवम दुबे ७१ आणि वृद्धिमान साहाने केलेल्या ६६ धावांच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ३१२ धावा केल्या होत्या. या सामन्यात नदीमने १०९ धावांत १० बळी टिपले आहेत.