लखनौ - दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाने पाचव्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारताचा ५ गड्यांनी पराभव केला. या विजयासह आफ्रिका संघाने पाच सामन्याची मालिका ४-१ अशा फरकाने जिंकली आहे. भारताने दिलेले १८९ धावांचे माफक लक्ष्य आफ्रिका संघाने बोशच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर सहज पूर्ण केले.
-
🏆 ODI series trophy in hand#MomentumProteas #AlwaysRising pic.twitter.com/zTyddv5quB
— Cricket South Africa (@OfficialCSA) March 17, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">🏆 ODI series trophy in hand#MomentumProteas #AlwaysRising pic.twitter.com/zTyddv5quB
— Cricket South Africa (@OfficialCSA) March 17, 2021🏆 ODI series trophy in hand#MomentumProteas #AlwaysRising pic.twitter.com/zTyddv5quB
— Cricket South Africa (@OfficialCSA) March 17, 2021
अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ४९.३ षटकात ९ बाद १८८ धावा केल्या. यात कर्णधार मिताली राजने नाबाद ७९ धावाची खेळी साकारली. मितालीने १०४ चेंडूंत ८ चौकार आणि एका षटकारासह ही खेळी केली. मिताली वगळता अन्य फलंदाज आफ्रिकेचा माऱ्याचा सामना करण्यात अपयशी ठरले. हरमनप्रीतला फलंदाजीदरम्यान, दुखापत झाली. यामुळे तिने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. तिने ३ चौकारांच्या मदतीने ३० धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून नादिन डी क्लर्कने ३, शांगसे आणि तूमी सेखुखुनेने प्रत्येकी २-२ गडी टिपले. कापने १ गडी बाद केला.
-
⛔ RESULT | #MomentumProteas WIN BY 5 WICKETS
— Cricket South Africa (@OfficialCSA) March 17, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Mignon du Preez (57) and Anneke Bosch (57) shared a 96-run 4th-wicket partnership to set the team up and seal the series 4-1#INDvSA #AlwaysRising@Momentum_za pic.twitter.com/QvwUv9lC0l
">⛔ RESULT | #MomentumProteas WIN BY 5 WICKETS
— Cricket South Africa (@OfficialCSA) March 17, 2021
Mignon du Preez (57) and Anneke Bosch (57) shared a 96-run 4th-wicket partnership to set the team up and seal the series 4-1#INDvSA #AlwaysRising@Momentum_za pic.twitter.com/QvwUv9lC0l⛔ RESULT | #MomentumProteas WIN BY 5 WICKETS
— Cricket South Africa (@OfficialCSA) March 17, 2021
Mignon du Preez (57) and Anneke Bosch (57) shared a 96-run 4th-wicket partnership to set the team up and seal the series 4-1#INDvSA #AlwaysRising@Momentum_za pic.twitter.com/QvwUv9lC0l
प्रत्युत्तरादाखल आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली नाही. लोरा वॉलवॉर्ट (0), लारा गुडऑल (1) आणि कर्णधार सुने लूस (10) स्वस्तात बाद झाल्या. तेव्हा यानंतर डु प्रेज आणि एने बोश यांनी चौथ्या गड्यासाठी ९६ धावांची भागिदारी रचली. बोशने ८ चौकारांसह ५८ तर, डु प्रेजने ४ चौकारांसह ५७ धावा केल्या. ही जोडी तुटल्यानंतर मरिजाने काप आणि क्लर्कने संघाला विजय मिळवून दिला. भारताकडून राजेश्वरी गायकवाडने 3 तर, हेमलता आणि सी. प्रत्युषा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. अर्धशतकी खेळीमुळे बोशला सामनावीर तर, लिझेली ली हिला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. आता उभय संघात २० मार्चपासून टी-२० मालिका रंगणार आहे.
हेही वाचा - IND vs ENG : शार्दुलचे गचाळ क्षेत्ररक्षण, विराटचा चढला पारा; व्हिडिओ व्हायरल
हेही वाचा - ICC T२० Rankings : कोहलीला 'विराट' कामगिरीचे बक्षिस, राहुलला फटका