ETV Bharat / sports

IND W vs SA W १st ODI : दक्षिण अफ्रिकेचा भारतावर ८ गडी राखून विजय - भारत वि. आफ्रिका महिला क्रिकेट सामना न्यूज

दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघाचा ८ गडी राखून पराभव केला आणि पाच सामन्याच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली.

ind-w-v-sa-w-1st-odi-lee-wolvaardt-shine-as-visitors-defeat-hosts-by-8-wickets
IND W vs SA W : पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण अफ्रिकेचा भारतावर ८ गडी राखून विजय
author img

By

Published : Mar 7, 2021, 5:20 PM IST

लखनऊ - तब्बल १२ महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाला, पहिल्याच सामन्यात पराभवाचा जबर धक्का बसला. दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघाचा ८ गडी राखून पराभव केला. या विजयासह आफ्रिका संघाने पाच सामन्याच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली.

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारतीय महिला संघाने प्रथम फलंदाजी केली. कर्णधार मिताली राजच्या अर्धशतकी (५०) खेळीच्या जोरावर भारताने ५० षटकात ९ बाद १७७ धावांपर्यंत मजल मारली. मितालीने ८५ चेंडूत चार चौकार आणि १ षटकारासह ५० धावांची खेळी केली. मितालीचे हे करियरमधील ५४ वे अर्धशतक ठरले. आफ्रिकेकडून शब्निम इस्माइल हिने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर नोनकुललेको हिने २, मरिजाने काप, अयाबोंगा खाका आणि सूने लूस यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला.

भारताने विजयासाठी दिलेले १७८ धावांचे आव्हान आफ्रिकेच्या संघाने ४०.१ षटकात २ गड्यांच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले. आफ्रिकेकडून लिजेल ली हिने नाबाद ८३ धावांची खेळी केली. तर बोल्वार्डटने ८० धावा केल्या. उभय संघातील दुसरा एकदिवसीय सामना ९ मार्चला खेळला जाणार आहे.

हेही वाचा - इंग्लंड संघातून 'या' खेळाडूला लवकरच मिळणार डच्चू; वॉनची भविष्यवाणी

हेही वाचा - ब्रेकिंग न्यूज! आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचे वेळापत्रक आले समोर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.