ETV Bharat / sports

'ऑस्ट्रेलियातील विश्व करंडकाला बराच अवधी, सध्या मालिका जिंकायचयं'

रोहित शर्माने पत्रकारांशी बोलताना सांगितलं, की 'आगामी ऑस्ट्रेलियातील टी-२० विश्व करंडक स्पर्धेसाठी आम्ही तयारी करत आहोत, असे म्हणणार नाही. विश्व करंडकासाठी अजून बराच अवधी शिल्लक आहे. सध्या संघाचे लक्ष्य मालिका विजयाचे आहे.'

ind vs wi : world cup is long way away lets focus on present says rohit sharma
'ऑस्ट्रेलियातील विश्व करंडकाला बराच अवधी, सध्या मालिका जिंकायचयं'
author img

By

Published : Dec 10, 2019, 8:16 PM IST

मुंबई - भारत आणि वेस्ट इंडीज संघात उद्या (बुधवारी ता. ११) मुंबईमध्ये वानखेडे स्टेडियमवर तिसरा सामना होणार आहे. तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील हा सामना महत्त्वाचा आहे. कारण सध्या दोन्ही संघांनी एक-एक सामना जिंकला आहे. यामुळे दोनही संघ मालिका विजयासाठी मैदानात उतरतील. या सामन्याआधी भारतीय सलामीवीर रोहित शर्माने पत्रकारांशी वार्तालाप केला.

रोहित शर्माने पत्रकारांशी बोलताना सांगितलं, की 'आगामी ऑस्ट्रेलियातील टी-२० विश्व करंडक स्पर्धेसाठी आम्ही तयारी करत आहोत, असे मी म्हणणार नाही. कारण विश्व करंडकासाठी अजून बराच अवधी शिल्लक आहे. सध्या संघाचे लक्ष मालिका विजयाचे आहे.'

उभय संघात तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात येत आहे. हैदराबाद येथील पहिला सामना भारतीय संघाने जिंकला तर दुसरा सामना तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड मैदानात रंगला होता. या सामन्यात वेस्ट इंडीजने सलामीवीर सिमन्सच्या अर्धशतकी खेळीने भारतावर ८ गडी राखून विजय मिळवला. मालिकेचा अखेरचा निर्णायक सामना उद्या ११ डिसेंबरला होणार आहे.

भारतीय संघ -
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमार.

वेस्ट इंडीजचा संघ -
केरॉन पोलार्ड (कर्णधार), फॅबियन एलेन, शेल्डन कॉट्रेल, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, कीमो पॉल, ब्रँडन किंग, एविन लुईस, खॅरी पियरे, निकोलस पूरन, दिनेश रामदीन, शेरफेन रदरफोर्ड, लेंडल सिमन्स, केसरिक विलियम्स आणि हेडन वॉल्स ज्युनिअर.

हेही वाचा - 'आम्ही कोणत्याही संघाला घाबरत नाही, लढतीसाठी सज्ज'

हेही वाचा - IND VS WI : रोहित शर्माने सांगितलं का काढली दाढी

Intro:Body:

sports news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.