चेन्नई - वेस्ट इंडीजचा फलंदाज शेमरॉन हेटमायरने पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय गोलंदाजीची पिसे काढली. त्याने भारतीय गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेत मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. हेटमायरने १०६ चेंडूत ११ चौकार आणि ७ षटकारांसह १३९ धावा केल्या. या खेळी दरम्यान, त्याने रवींद्र जडेजाच्या चेंडूवर मारलेला षटकार पाहून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीही हतबल झालेला पाहायला मिळाला.
-
That's landed at the Marina beach!
— Hotstar US (@Hotstarusa) December 15, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
° °
° °
° °
🏟 🏖
Take a bow, Hetmyer, 139 (106)! 🙌#INDvWI #FriendsTurnFoes pic.twitter.com/8hydgqYDPo
">That's landed at the Marina beach!
— Hotstar US (@Hotstarusa) December 15, 2019
° °
° °
° °
🏟 🏖
Take a bow, Hetmyer, 139 (106)! 🙌#INDvWI #FriendsTurnFoes pic.twitter.com/8hydgqYDPoThat's landed at the Marina beach!
— Hotstar US (@Hotstarusa) December 15, 2019
° °
° °
° °
🏟 🏖
Take a bow, Hetmyer, 139 (106)! 🙌#INDvWI #FriendsTurnFoes pic.twitter.com/8hydgqYDPo
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना श्रेयस अय्यर (७०) आणि ऋषभ पंत (७१) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर विंडीजला २८८ धावांचे आव्हान दिले. तेव्हा विंडीजची सुरुवात खराब झाली. सलामीवीर सुनील अम्ब्रीस बाद झाल्यानंतर शेमरॉन हेटमायरने शाई होपच्या साथीने भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. हेटमायरने १०६ चेंडूत १३९ धावा केल्या. याचसोबत दुसऱ्या विकेटसाठी हेटमायरने शाई होपसोबत द्विशतकी भागीदारीही केली.
हेटमायरने ३६ व्या षटकात रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर उत्तुंग षटकार खेचत चेंडू थेट मैदानाच्या बाहेर मारला. त्याचा हा आक्रमक अवतार पाहून भारतीय कर्णधार विराट कोहलीही हतबल झालेला पाहायला मिळाला. दरम्यान, हेटमायर आणि शाय होपच्या शतकी खेळीच्या जोरावर विंडीजने हा सामना ८ गडी राखून जिंकला आणि ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. उभय संघात दुसरा सामना १८ डिसेंबरला विशाखापट्टणमच्या मैदानात रंगणार आहे.
हेही वाचा - 'इतक्या वर्षांनंतरही सचिन तेंडुलकरला मी लक्षात आहे, हे अविश्वसनीय!'
हेही वाचा - पाकच्या आबिद अलीचा विश्वविक्रम, एकदिवसीयनंतर पदार्पणाच्या कसोटीत ठोकलं शतक