विशाखापट्टणम - दुखापतीतून सावरल्यानंतर जसप्रीत बुमराहने भारतीय संघासोबत सराव केला. बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर बुमराहचा फोटो शेअर करत याची माहिती दिली. दरम्यान, भारत-वेस्ट इंडीज यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना विशाखापट्टणमच्या मैदानावर रंगणार आहे. दोनही संघांनी या सामन्याआधी कस्सून सराव केला.
जसप्रीत बुमराह दुखापतीतून सावरल्यानंतर तो आज पुन्हा मैदानात परतला. आज त्याची सरावादरम्यान, 'फिटनेस' चाचणी घेण्यात आली. जुलै-ऑगस्ट महिन्यात वेस्ट इंडीज विरुद्ध खेळण्यात आलेल्या मालिकेमध्ये बुमराहला दुखापत झाली होती. यामुळे तो संघाबाहेर होता.
-
Look who's here 👀👀 pic.twitter.com/Ex7aknjDBn
— BCCI (@BCCI) December 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Look who's here 👀👀 pic.twitter.com/Ex7aknjDBn
— BCCI (@BCCI) December 17, 2019Look who's here 👀👀 pic.twitter.com/Ex7aknjDBn
— BCCI (@BCCI) December 17, 2019
बीसीसीआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. त्याला बीसीसीआयने 'पाहा कोण आला आहे', असे मजेशीर कॅप्शनही दिले आहे. भारतीय संघ वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्याआधी सराव करत होता. या सराव सत्रात बुमराहने हजेरी लावली आणि त्याने नेटमध्ये गोलंदाजी केली.
बीसीसीआयने शेअर केलेल्या फोटोमध्ये मुंबईचा युवा खेळाडू पृथ्वी शॉ देखील दिसून येत आहे. शॉ पहिले दुखापतीमुळं नंतर डोपिंग चाचणीत दोषी आढळल्यानं, क्रिकेटपासून लांब होता. डोपिंग प्रकरणात शॉवर बंदीची कारवाई करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच बंदीचा कालवधी संपला असून तो पुन्हा मैदानात परतला आहे. शॉ ने सय्यद मुस्ताक अली करंडकाद्वारे क्रिकेटमध्ये पुनरागमन केले.
हेही वाचा - भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, 'हा' खेळाडू भारतीय संघाला धोकादायक ठरणार ?
हेही वाचा - विराट आणि स्मिथसाठी लाबुशेन बनला खतरा, कसोटी क्रमवारीत ११० वरुन टॉप-५ मध्ये दाखल