ETV Bharat / sports

IND VS WI : 'हे' आहेत भारताच्या विजयाचे शिल्पकार

भारताच्या विंडीज विरुद्धच्या विजयात कोणत्या खेळाडूंनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. ते वाचा...

Ind vs wi : India come back to the show in the power of the five lions, beating the West Indies
IND VS WI : 'हे' आहेत भारताच्या विजयाचे शिल्पकार
author img

By

Published : Dec 19, 2019, 2:25 PM IST

हैदराबाद - वेस्ट इंडीज विरुद्धच्या दुसरा एकदिवसीय सामना भारतीय संघाने १०७ धावांनी जिंकला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. विंडीज कर्णधार केरॉन पोलार्डने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तेव्हा भारतीय संघाने ५० षटकात ५ बाद ३८७ धावांचा डोंगर उभारला. तेव्हा प्रत्त्युतरादाखल विंडीजचा संघ ४३.३ षटकात सर्वबाद २८० धावा करु शकला. दरम्यान, भारताच्या या विजयात कोणत्या खेळाडूंनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. ते वाचा...

रोहित शर्मा -
पहिल्या सामन्यात अपयशी ठरल्यानंतर रोहित शर्माने दुसऱ्या सामन्यात शतकी खेळी केली. त्याने या सामन्यात १३८ चेंडूत १७ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने १५९ धावा केल्या. त्याने केएल राहुलसोबत पहिल्या विकेटसाठी २२७ धावांची भागिदारी केली.

Ind vs wi : India come back to the show in the power of the five lions, beating the West Indies
रोहित शर्मा...

केएल राहुल -
भारताचा दुसरा सलामीवीर फलंदाज केएल राहुलने या सामन्यात शतक झळकावलं. त्याचे हे एकदिवसीय कारकिर्दीतील चौथे शतक ठरले. शिखर धवनला झालेल्या दुखापतीमुळे संघात संधी मिळालेल्या राहुलने टी-२० पाठोपाठ एकदिवसीय मालिकेतही दमदार कामगिरी केली. त्याने दुसऱ्या सामन्यात १०४ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १०२ धावा केल्या.

केएल राहुल षटकार ठोकताना...

कुलदीप यादव -
भारताचा फिरकीपटू गोलंदाज कुलदीप यादवने या सामन्यात हॅट्ट्रीक घेतली. कुलदीपने या सामन्यात १० षटकात ५२ धावा देत विंडीजच्या तीन गड्यांना तंबूत धाडलं.

कुलदीप यादव बळी घेतल्यानंतर आनंद साजरा करताना...

श्रेयस अय्यर -
श्रेयस अय्यरने पहिल्या एकदिवसीय सामन्यातील आपली लय कायम राखली. त्याने दुसऱ्या सामन्यात सलग दुसरे अर्धशतक झळकावलं. अय्यरने ३२ चेंडूचा सामना करताना ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने झटपट ५३ धावा केल्या.

श्रेयस अय्यर...
मोहम्मद शमी - मोहम्मद शमी भारतीय संघासाठी पुन्हा हुकमी 'एक्का' ठरला. त्याने या सामन्यात ७.३ षटकाची गोलंदाजी केली. यात त्याने ३९ धावा देत ३ गडी बाद केले. विंडीज कर्णधार केरॉन पोलार्डला त्याने भोपळाही फोडू दिलं नाही.

शमी इशांत शर्मासह सरावादरम्यान...

ऋषभ पंत -
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने सलग दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात चांगली फलंदाजी केली. त्यानं या सामन्यात १६ चेंडूवर ३९ धावा चोपल्या. पंतने अय्यरसोबत आक्रमक फलंदाजी केली आणि वेगाने धावा जमवल्या.

ऋषभ पंत अय्यरसोबत...

Intro:Body:

spo

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.