कटक - वेस्ट इंडीजविरुद्ध अखेरच्या एकदिवसीय सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करणाऱ्या शार्दुल ठाकूरचे भारतीय कर्णधार विराट कोहलीने मराठीतून कौतूक केले. त्याने, सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला असून त्या फोटोला त्याने 'तुला मानला रे ठाकूर !' असे मराठीतून कॅप्शन देत शार्दुलचे कौतुक केले आहे.
कटकच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात विंडीजने प्रथम फलंदाजी करत ३१५ धावा केल्या. तेव्हा भारतीय संघाने कर्णधार विराट कोहली, सलामीवीर लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांच्या अर्धशतकांच्या जोरावर हा सामना ४ गडी राखून जिंकला. पण, या सामन्यात शार्दुल ठाकूर संघासाठी तारणहार ठरला. त्याने मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करत भारतीय संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
शार्दुलने या सामन्यात ६ चेंडूत २ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने नाबाद १७ धावा केल्या. त्याच्या या खेळीवर कर्णधार विराट कोहली भलताच खुश झाला आहे. त्याने आपल्या ट्विटरवर शार्दुलसोबत एक फोटो टाकत, तुला मानलं रे ठाकूर ! अशी मराठीतून कॅप्शन देत त्याचं कौतुक केले.
-
Tula maanla re Thakur 👏😎😄 @imShard pic.twitter.com/fw9z3dZ8Zi
— Virat Kohli (@imVkohli) December 23, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Tula maanla re Thakur 👏😎😄 @imShard pic.twitter.com/fw9z3dZ8Zi
— Virat Kohli (@imVkohli) December 23, 2019Tula maanla re Thakur 👏😎😄 @imShard pic.twitter.com/fw9z3dZ8Zi
— Virat Kohli (@imVkohli) December 23, 2019
दरम्यान, सलामीवीर जोडीने चांगली सुरूवात दिल्यानंतर भारताची मधली फळी कोसळली. श्रेयस अय्यर, ऋषभ पंत आणि केदार जाधव झटपट माघारी परतले. तेव्हा कर्णधार विराट मोर्चा सांभाळला. मात्र तोही मोक्याच्या क्षणी ८५ धावांवर बाद झाला. यामुळे भारत सामना गमावतो की काय, असे चित्र निर्माण झाले होते. तेव्हा शार्दुलने दणकेबाज खेळी केली.
हेही वाचा - शमीचे 'फॅन' बनले गावस्कर, म्हणाले, शमीच्या गोलंदाजीमुळे मार्शलची आठवण येते
हेही वाचा - नवीन वर्षातील 'या' दोन मालिकांसाठी भारतीय संघाची आज होणार घोषणा