विशाखापट्टणम - भारत आणि वेस्ट इंडीज संघात दुसरा एकदिवसीय सामना विशाखापट्टणमच्या मैदानात रंगला आहे. विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तेव्हा सलामीवीर रोहित शर्मा (१५९) आणि केएल राहुल (१०२) यांच्या द्विशतकी भागिदारीच्या जोरावर भारतीय संघाने विंडीजसमोर ३८७ धावांचा डोंगर उभारला. दरम्यान, या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पहिल्या सामन्याप्रमाणेच अपयशी ठरला. त्याला भोपळाही फोडता आलं नाही. पण, विराटने आजच्या सामन्यात एक रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
विराट कोहलीच्या करिअरमधला आजचा ४०० वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. त्याने आतापर्यंत ८४ कसोटी आणि २४१ एकदिवसीय आणि ७५ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आहे. असा कारनामा करणारा विराट भारताचा आठवा खेळाडू ठरला. याआधी असा विक्रम सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी, राहुल द्रविड, मोहम्मद अजहरुद्दीन, सौरभ गांगुली, अनिल कुंबळे आणि युवराज सिंह यांनी केला आहे.
विराट कोहलीने २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. त्याने आजपर्यंतच्या ४०० सामन्यातील ४२२ इनिंगमध्ये २१ हजार ३५९ धावा केल्यात. विराटची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाजीची सरासरी ५७.२६ इतकी आहे. विराटच्या नावावर क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये एकूण ७० शतकं आणि १०० अर्धशतके आहेत.
हेही वाचा - एबी डिव्हीलियर्स वादळ टी-२० विश्व करंडकात घोंगावणार, कर्णधार डू प्लेसीसने दिले संकेत
हेही वाचा - पाहा कोण आलयं... बीसीसीआयने शेअर केला फोटो
हेही वाचा - रोहित शर्माचे कारकिर्दीतील २८ वे शतक, मोडले अनेक रेकॉर्ड