नवी दिल्ली - भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिका १-१ अशा बरोबरीत सुटली. या मालिकेनंतर २ ऑक्टोबरपासून उभय संघात कसोटी मालिका होणार आहे. तीन सामन्याच्या कसोटी मालिकेआधीच भारताला मोठा धक्का बसला आहे. आफ्रिकेविरुध्दच्या मालिकेत भारताचा हुकमी गोलंदाज जसप्रीत बुमराहने माघार घेतली आहे.
-
Just In: Jasprit Bumrah Ruled out of India-South Africa Tests due to stress fracture, to be replaced by Umesh Yadav
— Vikrant Gupta (@vikrantgupta73) September 24, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Just In: Jasprit Bumrah Ruled out of India-South Africa Tests due to stress fracture, to be replaced by Umesh Yadav
— Vikrant Gupta (@vikrantgupta73) September 24, 2019Just In: Jasprit Bumrah Ruled out of India-South Africa Tests due to stress fracture, to be replaced by Umesh Yadav
— Vikrant Gupta (@vikrantgupta73) September 24, 2019
हेही वाचा - जेव्हा धोनीने जिंकला होता पहिला विश्वचषक आणि सोबतच.. लोकांचा विश्वास
बुमराहच्या पाठीला दुखापत झाली आहे. यामुळे त्याने दक्षिण आफ्रिकेविरोधातील कसोटी मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, बुमराहने या मालिकेतून माघार घेतल्याने वेगवान गोलंदाज उमेश यादव याला संघात स्थान देण्यात आले आहे. भारत विरुध्द दक्षिण आफ्रिका संघामध्ये पहिला कसोटी सामना २ ऑक्टोबरला विशाखापटण्णम येथे होणार आहे. बुमराहने माघार घेतल्याने भारतासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
हेही वाचा - सुपर ओव्हरच्या नियमात बदल...असा ठरणार विजेता
भारताचा कसोटी संघ -
विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृध्दीमान साह (यष्टीरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा आणि शुभमन गील.