नवी दिल्ली - भारताविरुध्द टी-२० आणि कसोटी मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ रविवारी भारतात पोहोचला आहे. मालिकेत भारतीय संघाचे पारडे जड असल्याने आफ्रिकेच्या खेळाडूंनी पोहोचल्यानंतर लगेच तयारीला सुरुवात केली आहे.
इंग्लंडमध्ये पार पडलेल्या विश्वकरंडक स्पर्धेत दक्षिण आफ्रिका संघाची कामगिरी निराशजनक राहिली. या स्पर्धेनंतर आफ्रिकेचा संघ पहिल्याच दौऱ्यावर आहे. यामुळे आफ्रिकी खेळाडूंना चांगली कामगिरी करावी लागणार आहे. दरम्यान, आफ्रिकेला बलाढ्य 'इन फार्म' असलेल्या भारतीय संघाविरुध्द दोन हात करायचे आहे.
अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्ड होणार विंडीजचा नवा कर्णधार
दरम्यान, आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये आफ्रिकेचे खेळाडू जिममध्ये घाम गाळताना दिसत आहेत. या पोस्टसोबत क्रिकेट मंडळाने, आफ्रिकेचा संघ भारतात पोहोचला असून टी-२० मालिकेसाठी तयारीला सुरुवात करण्यात आली आहे, असा आशयाचा मजकूरही लिहला आहे.
भारतीय निवड समितीने आफ्रिकेविरुध्दच्या टी-२० मालिकेसाटी महेंद्रसिंह धोनीला विश्रांती दिली आहे. तर वेस्ट इंडीविरुध्दच्या मालिकेतील विजयी संघात फक्त एकमेव बदल करण्यात आला आहे. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याचे संघान पुनरागमन झाले आहे. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारलाही ताण पाहता संघात स्थान देण्यात आलेले नाही.
त्वचेचा कर्करोग असणाऱ्या मायकल क्लार्कने केली शस्त्रक्रिया
भारतीय टी-२० संघ -
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, खलील अहमद, दीपक चहर आणि नवदीप सैनी
दक्षिण आफ्रिकेचा संघ -
क्विंटन डी-कॉक (कर्णधार-यष्टीरक्षक), वॅन डर डसन (उपकर्णधार), टेम्बा बावुमा, ज्युनिअर डाला, बिजॉर्न फॉर्च्युन, ब्येरन हँड्रीक्स, रेझा हँड्रीक्स, डेव्हिड मिलर, अॅन्रिच नॉर्ट्जे, अँडील फेलुक्वायो, ड्वेन प्रेटोरियस, कगिसो रबाडा, तबरेज शम्सी आणि जॉन स्मट्स