ETV Bharat / sports

IND VS SA : रोहित-मयांकची जोडी जमली रे.., सेहवाग-गंभीरचा १५ वर्षांपूर्वीचा मोडला विक्रम - rohit mayank opening RECORD

रोहित आणि मयांक या जोडीने त्रिशतकी भागिदारी रचत १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला. दोघांनी भारताचे माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर या जोडीचा विक्रम मोडला. आफ्रिकेविरुद्ध सेहवाग आणि गंभीर या जोडीने २००४ साली कानपूर येथे झालेल्या सामन्यात २१८ धावांची सलामी दिली होती. हा विक्रम आज रोहित-मयांक या जोडीने मोडला.

IND VS SA : जोडी जमली रे.. रोहित-मयांकची धम्माल, सेहवाग-गंभीरचा १५ वर्षांपूर्वीचा मोडला विक्रम
author img

By

Published : Oct 3, 2019, 12:23 PM IST

Updated : Oct 3, 2019, 1:07 PM IST

विशाखापट्टणम - भारत आणि दक्षिण आफ्रिका संघामध्ये तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना विशाखापट्टणमच्या के.वाई.एस राजशेखर रेड्डी मैदानावर रंगला आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तेव्हा भारतीय सलामीवीर मयांक अग्रवाल आणि रोहित शर्मा या जोडीने आफ्रिकेच्या गोलंदाजीची पिसे काढली. दोघांनी त्रिशतकी सलामी देत आफ्रिकेला बॅकफूटवर टाकले.

रोहित आणि मयांक या जोडीने त्रिशतकी भागिदारी रचत १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला. दोघांनी भारताचे माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर या जोडीचा विक्रम मोडला. आफ्रिकेविरुद्ध सेहवाग आणि गंभीर या जोडीने २००४ साली कानपूर येथे झालेल्या सामन्यात २१८ धावांची सलामी दिली होती. हा विक्रम आज रोहित-मयांक या जोडीने मोडला.

याचबरोबर रोहित-मयांक जोडीने कसोटी क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक भागीदारीचा विक्रमही आपल्या नावे केला आहे. राहुल द्रविड आणि विरेंद्र सेहवाग यांनी २००८ साली २६८ धावांची भागीदारी केली होती. रोहित-मयांक जोडीने हा विक्रमही मोडत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे.

हेही वाचा - रोहित शर्मा : आयसीसीच्या क्रिकेट इतिहासात 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू

दरम्यान, विशाखापट्टणम येथे सुरू असलेल्या सामन्यात रोहित शर्मा आणि मयांक अग्रवाल या जोडीने ३१७ धावांची सलामी दिली. यात रोहित शर्माने २१ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने १७६ धावांची खेळी केली. तर मयांक १६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १३८ धावांवर नाबाद आहे. भारताने दुसऱ्या दिवसाच्या उपहारापर्यंत ८८ षटकात १ बाद ३२४ धावा केल्या आहेत.

हेही वाचा - भारताची त्रिशतकी सलामी, रोहित पाठोपाठ मयांक अग्रवालचेही शतक!

Intro:Body:

nnneeराष्ट्रवादीच्या २० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, बबनदादा शिंदेसह 

Conclusion:
Last Updated : Oct 3, 2019, 1:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.