पुणे - भारताचा सलामीवीर मयांक अग्रवाल याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात शतक झळकावले. या कामगिरीसह मयांक सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग यासारख्या दिग्गजांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे.
मयांकने विशाखापट्टणम येथील पहिल्या सामन्यात २१५ धावांची दणकेबाज खेळी केली. त्यानंतर आज गुरूवारी पुण्यातील गहुंजे मैदानात १९५ चेंडूत १०८ धावा केल्या. या कामगिरीसह तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग दोन शतके काढणारा भारताचा चौथा फलंदाज ठरला आहे.
दरम्यान, यापूर्वी १९९६ मध्ये मोहम्मद अझरुद्दीनने सर्वप्रथम अशी कामगिरी केली होती. त्याने कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानात १०९ धावा आणि कानपूरच्या मैदानात नाबाद १६३ धावा केल्या होत्या.
या यादीत दुसऱ्या क्रमाकांवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. याने २०१० मध्ये कानपूरला १०० आणि कोलकातामध्ये १०६ धावा केल्या होत्या. वीरेंद्र सेहवाग हा तिसऱ्या क्रमांकावर असून त्याने नागपूरला १०९ आणि कोलकातामध्ये १६५ धावा केल्या होत्या. दरम्यान, या यादीत मयांकने चौथे स्थान पटकावले आहे.
हेही वाचा - Exclusive Interview: सलग दोन शतकं झळकवणाऱ्या मयांक अग्रवालची खास मुलाखत, पाहा
हेही वाचा - Ind vs SA Update :पहिल्या दिवसाचा खेळ संपला, भारत ३ बाद २७३