बंगळुरु - भारत आणि दक्षिण आफ्रिका संघामध्ये ३ सामन्याची टी-२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील अखेरचा तिसरा सामना चिन्नास्वामी स्टेडियमवर रविवारी होत आहे. मात्र, या लढतीवर पावसाचे सावट निर्माण झाले आहे.
भारत विरुध्द आफ्रिका संघामध्ये सुरू असलेल्या मालिकेतील धर्मशाला येथे होणारा पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने आफ्रिकेवर ७ गडी राखून विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. अखेरचा सामना रविवारी होती असून या सामन्यावर पावसाचे सावट आहे.
दरम्यान, अखेरच्या या सामन्यात भारतीय संघ सलग दुसऱ्या विजय मिळवून मालिका जिंकण्याचा निर्धाराने मैदानात उतरेल. तर आफ्रिका विजय मिळवून मालिका बरोबरीच सोडण्याच्या प्रयत्न करेल. यासाठी आफ्रिकेला कामगिरी उंचावण्याचे आव्हान असेल.
दुसऱ्या सामन्यात आफ्रिकेला भारतीय गोलंदाजांनी १४९ धावांवर रोखले. त्यानंतर कर्णधार कोहलीने नाबाद ७२ धावांची शानदार खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. भारतीय संघ सर्व आघाडीत फुल्ल फॉर्मात आहे. यामुळे आफ्रिकेवरील दडपण वाढले आहे.
संभाव्य संघ -
भारत - विराट कोहली ( कर्णधार) , रोहित शर्मा, लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, खलील अहमद, दीपक चहर आणि नवदीन सैनी.
दक्षिण आफ्रिका - क्विंटन डि कॉक (कर्णधार), रॉसी व्हॅन डेर डुसेन, तेंबा बावुमा, ज्युनिअर डाला, ब्योर्न फोर्चुन, बुरान हेंड्रीक्स, रीजा हेंड्रीक्स, डेव्हिड मिलर, एनरिच नोर्जे, अँडिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरीयस, कागिसो रबाडा, तरबेझ शम्सी, जॅन जान स्मट्स.
हेही वाचा - भारतीय खेळाडूंची दिवाळी यंदा जोरात, बीसीसीआयकडून दैनिक भत्ता 'डबल'
हेही वाचा - कमाईत इंग्लंडचा जोफ्रा आर्चरने विराटला टाकले मागे, मिळवले इतके कोटी