ETV Bharat / sports

IPL गाजवणाऱ्या सूर्यकुमार यादव आणि इशान किशनचे टी-२० पदार्पण - इशान किशनचे टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण

इशान किशन आणि सूर्यकुमारला मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहलीने कॅप देऊन टीममध्ये स्वागत केले. तसेच इतर सहकाऱ्यांनीही या दोघांचं अभिनंदन करत शुभेच्छाही दिल्या.

ind-vs-eng-ishan-kishan-and-suryakumar-yadav-made-their-debut
IPL गाजवणाऱ्या सूर्यकुमार यादव आणि इशान किशनचे टी-२० पदार्पण
author img

By

Published : Mar 14, 2021, 9:52 PM IST

अहमदाबाद - इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात इशान किशन आणि सूर्यकुमार यादवला भारताच्या अंतिम संघात संधी देण्यात आली आहे. या निमित्ताने या दोन्ही खेळाडूंचे टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण झाले आहे. इशान किशन आणि सूर्यकुमारला मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहलीने कॅप देऊन टीममध्ये स्वागत केले. तसेच इतर सहकाऱ्यांनीही या दोघांचं अभिनंदन करत शुभेच्छाही दिल्या.

बीसीसीआयने दोघांना कॅप देतानाचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. हे दोन्ही फलंदाज आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतात. या दोघांनी आतापर्यंत आयपीएलमध्ये आपल्या टीमसाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. याच आधारावर दोघांनी या टी-२० मालिकेसाठी संधी देण्यात आली.

सूर्यकुमार आयपीएलच्या १३व्या मोसमात १६ सामने खेळला. या १६ सामन्यात त्याने ४ अर्धशतकांसह ४८० धावा केला. तर इशानने १३व्या मोसमातील १४ सामन्यातील १३ डावात फलंदाजी केली. यामध्ये त्याने १४५.७६ च्या स्ट्राईक रेटने तसेच ५७.३३ च्या सरासरीने ५१६ धावा केल्या आहेत.

  • इंग्लंडचा संघ -
  • जेसन रॉय, जोस बटलर (यष्टीरक्षक), डेविड मलान, जॉनी बेअरस्टो, इयॉन मॉर्गन (कर्णधार), बेन स्टोक्स, सॅम करन, जोफ्रा आर्चर, टॉम करन, ख्रिस जॉर्डन आणि आदिल रशिद.
  • भारतीय संघ -
  • के. एल. राहुल, इशान किशन, विराट कोहली (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार आणि युझवेंद्र चहल.

हेही वाचा - VHT २०२१ Final : मुंबईचा विजय हजारे करंडकावर कब्जा, अंतिम सामन्यात यूपीचा उडवला धुव्वा

हेही वाचा - एकदिवसीय क्रिकेटवर मिताली 'राज', अशी कामगिरी करणारी जगातील पहिली खेळाडू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.