ETV Bharat / sports

IND vs ENG : भारतीय गोलंदाजांनी केला नकोसा विक्रम

भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या पहिल्या डावात एकूण २० नोबॉल टाकले. जे भारताकडून आतापर्यंत सर्वाधिक आहेत. यात जसप्रीत बुमराहने ७, शाहबाज नदीमने ६ तर इशांत शर्माने ५ नोबॉल टाकले. तर उर्वरित दोन नोबॉल रविचंद्रन अश्विनने टाकले आहेत.

IND VS ENG 1 ST TEST : 20 no-balls that Indians bowled so far in England's first innings
IND vs ENG : भारतीय गोलंदाजांनी केला नकोसा विक्रम
author img

By

Published : Feb 7, 2021, 5:05 PM IST

चेन्नई - भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नईमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी एक नकोसा विक्रम आपल्या नावे केला आहे. भारताकडून एका डावात सर्वाधिक 'नोबॉल' टाकण्याची नकोशी कामगिरी गोलंदाजांनी केली.

भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या पहिल्या डावात एकूण २० नोबॉल टाकले. जे भारताकडून आतापर्यंत सर्वाधिक आहेत. यात जसप्रीत बुमराहने ७, शाहबाज नदीमने ६ तर इशांत शर्माने ५ नोबॉल टाकले. तर उर्वरित दोन नोबॉल रविचंद्रन अश्विनने टाकले आहेत.

भारतीय संघाने याआधी कसोटीच्या एका डावात १६ नोबॉल फेकले होते. २०१० साली श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघाने ही नकोसी कामगिरी केली होती. दरम्यान, एका डावात सर्वाधिक नोबॉल टाकण्याचा नकोसा विश्वविक्रम श्रीलंका संघाच्या नावे आहे. श्रीलंका संघाने २०१४ मध्ये बांग्लादेशविरुद्ध २१ नो बॉल टाकण्याचा पराक्रम केला होता.

इंग्लंडचा धावांचा डोंगर...

कर्णधार जो रूटचे दणकेबाज द्विशतक आणि डॉम सिबली, बेन स्टोक्स यांची अर्धशतके, यांच्या जोरावर इंग्लंडने भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ५७८ धावांचा डोंगर उभारला. पाहुण्या संघाचा पहिला डाव तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात संपुष्टात आला. भारताकडून जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी ३-३ गडी बाद केले.

हेही वाचा - India vs England : जो रुटने टिपला अविश्वसनीय झेल, पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.