इंदूर - बांगलादेश विरुध्दचा पहिला कसोटी सामना भारतीय संघाने एक डाव १३० धावांनी जिंकला. होळकर मैदानात रंगलेल्या या सामन्यात प्रेक्षकांनी बांगलादेशच्या मुश्फीकुर रहिमची हुर्ये उडवली. याचा एक व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मुश्फीकुर रहिम बाऊंड्री लाईन जवळ क्षेत्ररक्षण करताना दिसत आहे. यावेळी प्रेक्षकांनी त्याला उद्देशून '२ रुपये की पेप्सी, रहीम भाई सेक्सी' अशा घोषणा दिल्या.
-
2 Rupey ki Pepsi, Rahim bhai sexy.... 😂😂😂🙏🏼#INDvBAN pic.twitter.com/A0rZtY4Muw
— VisHal (@ImVpatel) November 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">2 Rupey ki Pepsi, Rahim bhai sexy.... 😂😂😂🙏🏼#INDvBAN pic.twitter.com/A0rZtY4Muw
— VisHal (@ImVpatel) November 17, 20192 Rupey ki Pepsi, Rahim bhai sexy.... 😂😂😂🙏🏼#INDvBAN pic.twitter.com/A0rZtY4Muw
— VisHal (@ImVpatel) November 17, 2019
दरम्यान, भारताने हा सामना जिंकला असला तरी, रहिमने या सामन्यात चिवट खेळी केली. त्याने पहिल्या डावात ४३ तर दुसऱ्या डावात ६४ धावा केल्या. भारतीय संघाने मोठ्या विजयासह २ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.
दोन्ही उभय संघातील अखेरचा कसोटी सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर २२ नोव्हेंबर पासून रंगणार आहे. हा सामना दिवस-रात्र खेळवण्यात येणार असल्याने, क्रिकेटसह चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
हेही वाचा - बेनला नडला पेन, म्हणाला, 'आपलं पुस्तक विकलं जाण्यासाठी तो हे सगळं करतोय'
हेही वाचा - 'संघात परत यायचं असेल तर 'हे' काम कर', इम्रानचा सरफराजला कानमंत्र