ETV Bharat / sports

Ind vs Aus : पंतला बाद करण्यासाठी स्टिव्ह स्मिथचा रडीचा डाव, व्हिडिओ व्हायरल - smith remove rishabh pants guard news

ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी पंतला बाद करण्याचे विविध मार्ग अवलंबले. यात ऑस्ट्रेलियाचा अनुभवी खेळाडू स्टिव्ह स्मिथ याने, पंतने घेतलेल्या गार्डची रेषा बुटाने पुसण्याचा प्रयत्न केला. याचा व्हिडिओ सद्या व्हायरल होत आहे.

ind vs aus 3rd test steve smith remove rishabh pants guard marks during drinks break see viral video
Ind vs Aus : पंतला बाद करण्यासाठी स्टिव्ह स्मिथचा रडीचा डाव, व्हिडिओ व्हायरल
author img

By

Published : Jan 11, 2021, 11:16 AM IST

सिडनी - तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात ऋषभ पंत आऊट होत नसल्याने, ऑस्ट्रेलियन खेळाडूने रडीचा डाव खेळला. याचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा कसोटी सामना सिडनीच्या मैदानात खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात भारतासमोर विजयासाठी ४०७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. अखेरच्या दिवशी ऋषभ पंतने झुंजार खेळी केली. त्याने ११८ चेंडूत १२ चौकार आणि ३ षटकारांसह ९७ धावांची खेळी साकारली. यादरम्यान, ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी त्याला बाद करण्याचे विविध मार्ग अवलंबले. यात ऑस्ट्रेलियाचा अनुभवी खेळाडू स्टिव्ह स्मिथ याने, पंतने घेतलेल्या गार्डची रेषा बुटाने पुसण्याचा प्रयत्न केला. याचा व्हिडिओ सद्या व्हायरल होत आहे.

ड्रिंक ब्रेकदरम्यान, स्मिथ पिचवर आला. त्याने पंतने घेतलेला गार्ड, पायातील बुट खेळपट्टीवर घासून पुसण्याचा प्रयत्न केला. ड्रिकनंतर पंत पुन्हा फलंदाजीसाठी खेळपट्टीवर आला. तेव्हा त्याने नविन गार्ड घेत फलंदाजीला सुरूवात केली आणि स्मिथचा डाव हाणून पाडला. दरम्यान, ड्रिंकनंतर पंतने फटकेबाजी केली. त्याची खेळी लिओनने संपुष्टात आणली.

हेही वाचा - IND vs AUS : ऋषभ पंतचे नाबाद अर्धशतक, सामना रोमांचक स्थितीत

हेही वाचा - England vs Sri Lanka: श्रीलंकाविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून मोइन अली बाहेर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.