हैदराबाद - १९ वर्षाखालील आयसीसी एकदिवसीय विश्व करंडक स्पर्धेची भारतीय युवा संघाने अंतिम फेरी गाठली. उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानच्या युवा संघाचा १० गडी राखून धुव्वा उडवला. यशस्वी जैस्वालने या सामन्यात नाबाद १०५ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. त्याला दिव्यांश सक्सेनाने नाबाद ५९ धावा करून चांगली साथ दिली. दरम्यान, भारतीय संघ सातव्यांदा अंतिम फेरी पोहोचला असून भारताचा अंतिम सामना न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.
यशस्वी जैस्वालने ११३ चेंडूत नाबाद १०५ धावांची खेळी साकारली. त्याच्या या खेळीत ८ चौकार आणि ४ षटकाराचा समावेश आहे. अंतिम फेरीत भारताचा सामना न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश यांच्यातील विजेत्याशी होणार आहे. १७३ धावांचा पाठलाग करताना, भारतीय सलामीवीरांनी सुरूवातीला जम बसवला. त्यानंतर त्यांनी फटकेबाजी केली. जैस्वालने पाकच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली.
-
That winning feeling 💪 #U19CWC | #INDvPAK | #FutureStars pic.twitter.com/DhSurNreyC
— Cricket World Cup (@cricketworldcup) February 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">That winning feeling 💪 #U19CWC | #INDvPAK | #FutureStars pic.twitter.com/DhSurNreyC
— Cricket World Cup (@cricketworldcup) February 4, 2020That winning feeling 💪 #U19CWC | #INDvPAK | #FutureStars pic.twitter.com/DhSurNreyC
— Cricket World Cup (@cricketworldcup) February 4, 2020
आयसीसी १९ वर्षाखालील एकदिवसीय विश्व करंडक स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार रोहिल नाझीरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण त्याचा हा निर्णय पुरता फसला. भारतीय माऱ्यासमोर पाकचा संघ १७२ धावांत आटोपला. सलामीवीर हैदर अली आणि कर्णधार रोहिल नाझीर यांचा अपवाद वगळता पाकच्या सर्व फलंदाजांनी निराशा केली.
टीम इंडियाची आकडेवारी -
- २००० साली भारत विजयी विरोधी संघ श्रीलंका
- २००६ साली भारताचा पराभव विरोधी संघ पाकिस्तान
- २००८ साली भारत विजयी विरोधी संघ दक्षिण आफ्रिका
- २०१२ साली भारत विजयी विरोधी संघ ऑस्ट्रेलिया
- २०१६ साली भारताचा पराभव विरोधी संघ वेस्ट इंडीज
- २०१८ मध्ये भारत विजयी विरोधी संघ ऑस्ट्रेलिया