ETV Bharat / sports

विजयी भव..! सचिन, विराटसह सिनियर खेळाडूकडून ज्युनिअर संघाला शुभेच्छा - भारतीय १९ वर्षांखालील संघ

आयसीसी विश्व करंडक (१९ वर्षाखालील) स्पर्धेच्या अंतिम सामन्याला काही वेळातच सुरुवात होणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात हा 'महामुकाबला' रंगणार आहे. भारतीय संघाची नजर पाचव्या विजेतेपदावर आहे. या सामन्याआधी भारताचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरने प्रियम गर्गच्या नेतृत्वात खेळत असलेल्या युवा संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.

ind u19 vs banu19  sachin tendulkars message for priyam gargs indian team ahead of u19 world cup final
विजयी भव..! सचिन, विराटसह सिनियर खेळाडूकडून ज्युनिअर संघाला शुभेच्छा
author img

By

Published : Feb 9, 2020, 1:11 PM IST

Updated : Feb 9, 2020, 2:20 PM IST

मुंबई - आयसीसी विश्व करंडक (१९ वर्षाखालील) स्पर्धेच्या अंतिम सामन्याला काही वेळातच सुरुवात होणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात हा 'महामुकाबला' रंगणार आहे. भारतीय संघाची नजर पाचव्या विजेतेपदावर आहे. या सामन्याआधी भारताचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरने प्रियम गर्गच्या नेतृत्वात खेळत असलेल्या युवा संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.

बीसीसीआयने दोन व्हिडिओ शेअर केले आहेत. पहिल्या व्हिडिओत कर्णधार विराट कोहली, मयांक अगरवाल, केदार जाधव तसेच भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारताच्या युवा संघाला शुभेच्छा देताना दिसून येत आहेत. तर दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून चेतेश्वर पुजारा, विजय शंकर, वृध्दीमान साहा आणि अजिंक्य रहाणे यांनी ज्युनिअर संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.

चेतेश्वर पुजारा म्हणतो की, 'मी तुम्हाला इतकेच सांगेन की, आतापर्यंत तुम्ही जसे खेळत आलात तसेच खेळा. अंतिम सामन्यात अतिरिक्त दबाव न घेता नैसर्गिक खेळावर भर द्या. मला विश्वास आहे की विश्व करंडक तुम्ही घरी घेऊन याल.

'भारताचा अष्टपैलू विजय शंकर म्हणतो की, 'अंतिम सामना ही एक मोठी संधी आहे त्याचा फायदा घ्या. तुम्हाला खुप शुभेच्छा !'

भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेने संपूर्ण देश तुमच्या पाठिशी उभा आहे. आतापर्यंत जसे खेळलात तशीच कामगिरी करा, असे म्हटले आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Feb 9, 2020, 2:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.