ETV Bharat / sports

बांगलादेशची झुंज अपयशी, अटीतटीच्या लढतीत न्यूझीलंड विजयी

अटीतटीच्या सामन्यात न्यूझीलंडने बांगलादेशवर २ गडी राखून विजय मिळवला. बांगलादेशने दिलेल्या २४५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडकडून रॉस टेलरने ८२ धावांची खेळी केली.

अटीतटीच्या लढतीत न्यूझीलंड विजयी
author img

By

Published : Jun 6, 2019, 7:16 AM IST

लंडन - अटीतटीच्या सामन्यात न्यूझीलंडने बांगलादेशवर २ गडी राखून विजय मिळवला. बांगलादेशने दिलेल्या २४५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडकडून रॉस टेलरने ८२ धावांची खेळी केली. त्याला कर्णधार केन विल्यमसननेही चांगली साथ दिली.

प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशचा डाव २४४ धावांवर आटोपला. बांगलादेशला न्यूझीलंडच्या भेदक माऱ्यापुढे हात मोकळे करण्याची फारशी संधी मिळू शकली नाही. शाकिब अल हसनने (६४) एकाकी झुंज देत अर्धशतकी खेळी केली. पण त्याला इतर फलंदाजांची साथ मिळू शकली नाही. त्यामुळे बांगलादेशने २४४ धावा केल्या.

चांगली सुरुवात करुन दिल्यानंतर मार्टीन गप्टील आणि कॉलिन मुनरो हे सलामीचे फलंदाज माघारी परतले. यानंतर रॉस टेलर आणि केन विल्यमसन यांनी भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. दोघांमध्येही तिसऱ्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी झाली.

बांगलादेशकडून मेहदी हसन, शाकीब अल हसन, मोहम्मद सैफुद्दीन, मोसादक हुसैन यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. तर न्यूझीलंडकडून हेन्रीने ४ बळी टिपले. ट्रेंट बोल्टने २ , तर फर्ग्युसन, ग्रँडहोम आणि सॅन्टनर यांनी १ बळी टिपत त्याला चांगली साथ दिली.

Intro:Body:

news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.