मँचेस्टर - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेतील भारत विरुध्द वेस्ट इंडिजच्या सामन्यावर पावसाचे संकट निर्माण झाले आहे. हवामान खात्याने या सामन्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. जर पावसाने मैदानात दमदार हजेरी लावली तर हा सामना रद्दही होऊ शकतो.
मँचेस्टरमध्ये मागील दोन दिवसांपासून पाऊस सुरु असल्याने भारताला मैदानात सरावही करता आलेला नाही. आजही मँचेस्टरमध्ये पावसाने हजेरी लावली. उद्या गुरुवारी होणाऱ्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्यातही पाऊस पडणार असल्याचे भाकित हवामान खात्याने वर्तवले आहे.
स्पर्धेत पावसाने रद्द झालेले सामने -
विश्वकरंडक स्पर्धेत यापूर्वी भारताचा न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला होता. याचबरोबर पाकिस्तान-श्रीलंका, दक्षिण आफ्रिका-वेस्ट इंडिज आणि बांगलादेश-श्रीलंका हेही सामने पावसामुळे रद्द झाले आहेत.