ETV Bharat / sports

कसोटी चॅम्पियनशिपच्या वेळापत्रकाचा आयसीसी घेणार आढावा

आयसीसीच्या अधिकाऱ्याने सांगितले, सध्याच्या परिस्थितीमुळे एफटीपीवर (फ्यूचर टूर प्रोग्राम) काम करावे लागेल कारण यामुळे अनेक देशांच्या द्विपक्षीय वचनबद्धता अक्षरशः अशक्य झाल्या आहेत. परंतु हे तेव्हाच होईल जेव्हा हे समजेल की या साथीचा परिणाम एफटीपीवर कसा झाला आहे.''

icc will review the schedule of test championship due to corona
कसोटी चॅम्पियनशिपच्या वेळापत्रकाचा आयसीसी घेणार आढावा
author img

By

Published : Jun 29, 2020, 5:59 PM IST

नवी दिल्ली - कोरोनामुळे अनेक क्रिकेट मालिका रद्द करण्यात आल्या असून या व्हायरसचा प्रभाव आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपच्या वेळापत्रकावरही पडला आहे. आयसीसी आता या स्पर्धेच्या वेळापत्रकांचा आढावा घेण्याकडे लक्ष देत आहे.

आयसीसीच्या अधिकाऱ्याने सांगितले, सध्याच्या परिस्थितीमुळे एफटीपीवर (फ्यूचर टूर प्रोग्राम) काम करावे लागेल कारण यामुळे अनेक देशांच्या द्विपक्षीय वचनबद्धता अक्षरशः अशक्य झाल्या आहेत. परंतु हे तेव्हाच होईल जेव्हा हे समजेल की या साथीचा परिणाम एफटीपीवर कसा झाला आहे.''

ते म्हणाले, "आत्तापर्यंत काहीही बदललेले नाही. क्रिकेट किती शिल्लक आहे आणि टी-20 विश्वचषक केव्हा होईल, हे आम्हाला समजले आहे. 2023 मध्ये एफटीपीचा आढावा घ्यावा लागले. नुकसानभरपाई करावी लागेल.

ते पुढे म्हणाले, "टी-20 विश्वकरंडक स्पर्धेव्यतिरिक्त अन्य मुद्द्यांवरही चर्चा झाली. आपणास ठाऊक आहे की कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धा सर्व सदस्यांच्या अगदी जवळ आहे. आयसीसी पुन्हा वेळापत्रकावर काम करेल आणि जे सामने झाले नाहीत, त्यांचा समावेश केला जाईल. पॉईंट्स सिस्टममध्ये बदल होईल. हे सर्व निर्णय ऑक्टोबरच्या सुमारास घेतले जातील. कारण आतापर्यंत आपल्याकडे ठोस योजना असू शकत नाही. कोरोनाव्हायरसने खेळाचे नुकसान केले आहे आणि आपण यासाठी कोणालाही दोष देऊ शकत नाही."

ते म्हणाले, "जे काही ठरवले जाईल ते सर्व सदस्यांच्या सहमतीने होईल. पहिली चॅम्पियनशिप लवकरात लवकर संपली पाहिजे यात काही शंका नाही. परंतु त्याचवेळी वेळापत्रक पुन्हा तयार करण्यासाठी 2-3 महिने लागतील. कारण शेवटी कसोटी सामने द्विपक्षीय मालिका म्हणून खेळल्या जातील.

चॅम्पियनशिपमध्ये भारत सध्या 360 गुणांसह प्रथम क्रमांकावर आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.