ETV Bharat / sports

आंतरराष्ट्रीय क्रिकेट अंपायरचा बॉम्बस्फोटात मृत्यू!

१२ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंच म्हणून काम पाहिलेले बिस्मिल्ला जान शेनवारी यांचा शनिवारी अफगाणिस्तानाच्या नांगरहार प्रांतात झालेल्या बॉम्बस्फोटात मृत्यू झाला. नांगरहार प्रांताचे राज्यपाल प्रवक्ता अताउल्ला खोगायानी यांनी शनिवारी ही माहिती दिली.

author img

By

Published : Oct 4, 2020, 3:47 PM IST

icc umpire bismillah jan shinwari dies in nangarhar roadside blast afghanistan
आंतरराष्ट्रीय क्रिकेट अंपायरचा बॉम्बस्फोटात मृत्यू!

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच बिस्मिल्ला जान शेनवारी यांचा शनिवारी अफगाणिस्तानाच्या नांगरहार प्रांतात झालेल्या बॉम्बस्फोटात मृत्यू झाला. ३६ वर्षीय बिस्मिल्ला यांनी अफगाणिस्तान आणि अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंच म्हणून काम पाहिले आहे. या अपघातात त्यांच्या कुटुंबातील सात जणांचाही मृत्यू झाला आहे.

नांगरहार प्रांताचे राज्यपाल प्रवक्ता अताउल्ला खोगायानी यांनी शनिवारी ही माहिती दिली. राज्यपालांच्या प्रवक्त्याने सांगितले, की नांगरात प्रांतातील शिनवार जिल्ह्यात दुपारी साडेबारा वाजता हे बॉम्बस्फोट झाले. पोलीस ठाण्यात घुसण्याच्या प्रयत्नात दहशतवाद्यांनी हा स्फोट घडवून आणला. स्थानिक माध्यमांच्या म्हणण्यानुसार या हल्ल्यात किमान १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ३०हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मात्र, कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

शेनवारी यांनी १२ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंच म्हणून काम पाहिले आहे. यात ६ एकदिवसीय आणि ६ टी-२० सामन्यांचा समावेश आहे. ७ डिसेंबर २०१७ ला शेनवारी यांनी सर्वात पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय पंच म्हणून अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड संघात झालेल्या एकदिवसीय सामन्यात काम केले होते. तर, १० मार्च २०२०ला अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड संघात झालेल्या टी-२० सामन्यात त्यांनी शेवटची पंचगिरी केली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.