दुबई - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सिडनी कसोटी सामना संपल्यानंतर आयसीसीने मंगळवारी ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. ताज्या क्रमवारीनुसार, भारताचा कर्णधार विराट कोहलीला फलंदाजांच्या क्रमवारीतील दुसरे स्थान गमवावे लागले आहे. याशिवाय रहाणे, अश्विन आणि बुमराह यांना देखील फटका बसल्याचे दिसून येत आहे.
विराट पत्नी अनुष्काच्या बाळंतपणासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतला आहे. याचा फटका त्याला बसला आहे. त्याची तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने अव्वल स्थान कायम राखले आहे. तर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टिव्ह स्मिथ दुसऱ्या स्थानावर सरकला आहे.
-
Kane Williamson retains the top spot!
— ICC (@ICC) January 12, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
⬆️ Steve Smith takes second place
⬆️ Henry Nicholls leaps into the top 10
Here's the latest update in the @MRFWorldwide ICC Test Rankings ☝️#ICCRANKINGS pic.twitter.com/nliMxZQQGK
">Kane Williamson retains the top spot!
— ICC (@ICC) January 12, 2021
⬆️ Steve Smith takes second place
⬆️ Henry Nicholls leaps into the top 10
Here's the latest update in the @MRFWorldwide ICC Test Rankings ☝️#ICCRANKINGS pic.twitter.com/nliMxZQQGKKane Williamson retains the top spot!
— ICC (@ICC) January 12, 2021
⬆️ Steve Smith takes second place
⬆️ Henry Nicholls leaps into the top 10
Here's the latest update in the @MRFWorldwide ICC Test Rankings ☝️#ICCRANKINGS pic.twitter.com/nliMxZQQGK
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला दोन स्थानाचा फायदा झाला आहे. तो सहाव्या क्रमाकावर पोहोचला आहे. अजिंक्य रहाणेची एका स्थानाने घसरण झाली असून तो सातव्या स्थानी आहे. चेतेश्वर पुजाराची क्रमवारी सुधारली असून तो १०व्या स्थानावरून ८ व्या स्थानी पोहोचला आहे.
गोलंदाजीत पॅट कमिन्सने पहिले स्थान कायम राखले आहे. तर जोश हेजलवूडने आठव्या स्थानावरून ५ व्या स्थानी झेप घेतली आहे. तर जेम्स अँडरसन सातव्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कची तीन स्थानाने घरसण झाली आहे. तो ८ व्या स्थानी घसरला आहे. याशिवाय अश्विन आणि जसप्रीत बुमराह अनुक्रमे नवव्या आणि दहाव्या स्थानावर विराजमान झाले आहेत.
-
Australia's Josh Hazlewood moves up three places ⬆
— ICC (@ICC) January 12, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Here's the latest bowling update in the @MRFWorldwide ICC Test Rankings pic.twitter.com/F1z6IdS9oH
">Australia's Josh Hazlewood moves up three places ⬆
— ICC (@ICC) January 12, 2021
Here's the latest bowling update in the @MRFWorldwide ICC Test Rankings pic.twitter.com/F1z6IdS9oHAustralia's Josh Hazlewood moves up three places ⬆
— ICC (@ICC) January 12, 2021
Here's the latest bowling update in the @MRFWorldwide ICC Test Rankings pic.twitter.com/F1z6IdS9oH
हेही वाचा - भारतीय संघाला आणखी एक धक्का, जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त
हेही वाचा - 'सिडनी' अनिर्णित राखल्यानंतर रहाणेने मारली अश्विनला मिठी, ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल