दुबई - पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका संपल्यानंतर आयसीसीने कसोटी रॅकिंग जारी केली आहे. यात भारतीय संघ दुसऱ्या स्थानी कायम आहे. तर पाकिस्तानने टॉप-५ मध्ये एन्ट्री केली आहे.
पाकिस्तान संघाने मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्धची दोन सामन्याची कसोटी मालिका २-० ने जिंकली. त्याचा पाकिस्तान संघाला फायदा झाला असून पाकचे रॅकिंग सुधारले आहे. मालिका विजयामुळे पाकिस्तानचे आठ गुण वाढले असून पाकिस्तानच्या संघाने पाचव्या स्थानी झेप घेतली आहे.
-
Pakistan gain eight rating points to jump to No.5 in the @MRFWorldwide ICC Test Team Rankings after the #PAKvSA series 👏 pic.twitter.com/l05HwixTd0
— ICC (@ICC) February 8, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Pakistan gain eight rating points to jump to No.5 in the @MRFWorldwide ICC Test Team Rankings after the #PAKvSA series 👏 pic.twitter.com/l05HwixTd0
— ICC (@ICC) February 8, 2021Pakistan gain eight rating points to jump to No.5 in the @MRFWorldwide ICC Test Team Rankings after the #PAKvSA series 👏 pic.twitter.com/l05HwixTd0
— ICC (@ICC) February 8, 2021
दुसरीकडे पराभूत आफ्रिकेचे मोठे नूकसान झाले आहे. आफ्रिकेचा संघ सहाव्या स्थानी घसरला आहे. असे असले तरी दोन्ही संघात १ गुणाचा फरक आहे. पाकचे ९० तर आफ्रिकेचे ८९ गुण आहेत.
दरम्यान, पाकिस्तान संघाने २०१७ नंतर प्रथमच टॉप-५ मध्ये प्रवेश मिळवला आहे. ताज्या रॅकिंगनुसार, श्रीलंकेचा संघ सातव्या, वेस्ट इंडीजचा संघ आठव्या स्थानी आहे. बांग्लादेशचा संघ या यादीत तळाशी नवव्या स्थानी आहे.
पाकने दुसरा सामना ९५ धावांनी जिंकला..
पाकिस्तान संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ९५ धावांनी पराभव केला आणि दोन सामन्याच्या मालिकेत २-० असे निर्भेळ यश मिळविले. पाकिस्तानने दिलेल्या ३७० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ २७४ धावांपर्यंत मजल मारू शकला. सलामीवीर एडेन मार्करम याने १३ चौकार आणि ३ षटकारांसह १०८ धावांची खेळी साकारली. पण तो देखील संघाचा पराभव वाचवू शकला नाही. हसन अलीने दुसऱ्या डावात ५ विकेट घेत आफ्रिकेच्या डावाला खिंडार पाडले. अलीने संपूर्ण सामन्यात १० गडी बाद केले. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
हेही वाचा - IND vs ENG : भारताला विजयासाठी ३८१ धावांची गरज
हेही वाचा - दुर्घटनेत बाल-बाल बचावला इंग्लंडचा खेळाडू, तिसऱ्या दिवशाचा खेळ संपल्यानंतर डोक्यात पडला जाहिरात बोर्ड