दुबई - दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिकेनंतर आयसीसीने ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. नव्या क्रमवारीनुसार टॉप-१० खेळाडूंच्या यादीत बदल पाहायला मिळाले. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची एका स्थानाने घसरण झाली आहे. तो नवव्या स्थानावरुन दहाव्या स्थानी पोहोचला आहे. तर दुसरीकडे भारताचा भरवशाचा फलंदाज केएल राहुल दुसऱ्या स्थानावर कायम आहे.
आयसीसीने जाहीर केलेल्या क्रमवारीत इंग्लंडचा कर्णधार ईयॉन मॉर्गन आणि क्विंटन डी कॉकला चांगला फायदा झाला आहे. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत मॉर्गनने चांगली कामगिरी करत मालिकावीरचा पुरस्कार पटकावला. या कामगिरीचा फायदा त्याला झाला असून तो विराटला मागं टाकत नवव्या स्थानी विराजमान झाला आहे. रोहित शर्मा ११ व्या स्थानी कायम आहे.
दुसरीकडे आफ्रिकेचा कर्णधार क्विंटन डी कॉकनेही इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी केली. त्याने टेम्बा बाऊमा यांच्यासोबत तिन्ही सामन्यात अर्धशतकी सलामी दिली. नव्या क्रमवारीनुसार डी कॉकने १० स्थानाची प्रगती केली. तो आता १६ व्या स्थानी आहे.
पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम फलंदाजीच्या यादीत पहिल्या स्थानावर कायम आहे. तर गोलंदाजीच्या क्रमवारीत कोणतेही बदल झालेले नाहीत. अफगाणिस्तानचा राशिद खान या यादीत पहिल्या स्थानावर कायम आहे.
हेही वाचा -
विराटचा नवा विक्रम, हॉलिवूडच्या अभिनेत्रीला टाकले मागे
हेही वाचा -
VIDEO: सचिनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, क्रीडा क्षेत्रातील 'ऑस्कर'ने सन्मान