दुबई - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे क्रीडा विश्व ठप्प आहे. जगभरातील जवळपास सर्व स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक झपाट्याने वाढ होत आहे. अशा स्थितीत आयसीसीने क्रिकेट पुन्हा सुरू करण्यासाठीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी त्यांनी दिशानिर्देश जाहीर केले आहेत. याशिवाय आयसीसीने चार वेगवेगळ्या टप्प्यांत सराव सुरू करण्याच्या सल्ला दिला आहे.
वाचा काय आहेत आयसीसीची मार्गदर्शकतत्त्वे -
- चेंडूला चमकवण्यासाठी थुंकीच्या वापरास बंदी
- चेंडू हाताळताना ग्लोव्ह्ज घालण्याचा पंचांना सल्ला
- खेळाडूंनी सरावापूर्वी व सरावानंतर साहित्य सॅनिटाइझ करणे आवश्यक
- खेळाडूंनी चेंडूच्या वापरादरम्यान हात वारंवार सॅनिटाइझ करणे
- खेळाडूंनी एकमेकांच्या साहित्याचा वापर टाळावा
- स्थानिक पातळीवर आजार पसरण्याचा धोका नसावा
- खेळाडूंनी जल्लोष करताना संपर्कात येण्याचे टाळावे
- एकमेकांच्या पाण्याची बॉटल, टॉवेलच्या वापरावर बंदी
- खेळाडूंना घरूनच तयार होऊन यावे लागेल
काय आहेत आयसीसीने सरावासाठी ठरवलेले चार टप्पे -
- पहिल्या टप्प्यात खेळाडूंना वैयक्तिक सरावाची सूट
- दुसऱ्या टप्प्यात तीन किंवा त्यापेक्षा कमी खेळाडू एकत्र सराव करू शकतील. पण, यात फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन आवश्यक
- तिसऱ्या टप्प्यात १० पेक्षा कमी खेळाडू एकत्र सराव करू शकतील
- चौथ्या टप्प्यात पूर्ण संघाला एकत्र फलंदाजी आणि गोलंदाजीचा सराव करता येईल.
दरम्यान, आयसीसीने खेळाडूंना फिजिकल डिस्टन्सिंग राखण्यास सांगितले आहे.
हेही वाचा - कोरोनाचा फटका.. सरावादरम्यान शौचालयाला जाऊ शकणार नाहीत क्रिकेटपटू!
हेही वाचा -ईद साजरी न करता मजुरांना करणार मदत, मुंबईच्या क्रिकेटपटूचा निर्णय