ETV Bharat / sports

ICC टी-२० विश्व करंडकात मोठा बदल, १६ नव्हे तर २० संघ खेळणार - ICC टी-२० विश्व करंडकात मोठा बदल

विश्व करंडकामध्ये संघांची संख्या वाढली तर दर्शकांची संख्या अधिक होईल. या माध्यमातून क्रिकेटच्या लोकप्रियतेमध्ये वाढ होईल, असे गणित आयसीसीचे आहे.

ICC planning to increase number of teams in T20 World Cup to 20
ICC टी-२० विश्व करंडकात मोठा बदल, १६ नव्हे तर २० संघ खेळणार
author img

By

Published : Jan 13, 2020, 3:43 PM IST

दुबई - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद टी-२० विश्व करंडक स्पर्धेत संघांची संख्या वाढवण्याचा विचारात आहे. यानुसार २०२३ ते ३१ या काळात होणाऱ्या टी-२० विश्व करंडक स्पर्धेत संघांची संख्या १६ वरून २० जाण्याची शक्यता आहे. पण, सध्या ऑस्ट्रेलियात ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विश्व करंडक स्पर्धेत १६ संघांचाच सहभाग असणार आहे.

एका मीडिया रिपोर्टनुसार, २०२३-३२ या काळात होणाऱ्या टी-२० विश्व करंडक स्पर्धेत संघांची संख्या वाढवण्यात येण्याची शक्यता आहे. या काळातील पहिला टी-२० विश्व करंडक २०२४ मध्ये होणार असून त्यात २० संघ खेळतील. त्यामुळे स्पर्धेच्या फॉरमॅटमध्येही बदल होण्याची शक्यता आहे.

विश्व करंडकामध्ये संघांची संख्या वाढली तर दर्शकांची संख्या अधिक होईल. या माध्यमातून क्रिकेटच्या लोकप्रियतेमध्ये वाढ पाहायला मिळेल, असे गणित आयसीसीचे आहे. दरम्यान, फुटबॉल आणि बास्केटबॉल प्रमाणे क्रिकेटची लोकप्रियता वाढवण्याचा आयसीसीचा प्रयत्न आहे.

कोणाला मिळू शकते संधी -
अमेरिका हा मोठा देश असल्याने, आयसीसी त्याकडे मोठी बाजारपेठ म्हणून पाहत आहे. याशिवाय कॅनडा, जर्मनी, नेपाळ आणि नायझेरिया या देशांना देखील टी-२० विश्व करंडकामध्ये खेळण्याची संधी मिळू शकते.

हेही वाचा - टीम इंडियाचा न्यूझीलंड दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक...

हेही वाचा - बुमराहला पॉली उम्रीगर तर श्रीकांत यांना जीवनगौरव, पाहा कोणत्या क्रिकेटपटूंना बीसीसीआयचे पुरस्कार

Intro:Body:

sports news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.