दुबई - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आगामी विश्व करंडक स्पर्धेसंदर्भात एका नव्या नियमाची घोषणा केली आहे. या नियमामुळे भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यासारख्या बलाढ्य संघांना फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काय आहे आयसीसीचा नवा नियम -
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, आयसीसी विश्व करंडकात सहभागी होणाऱ्या संघातील सदस्य संख्या कमी करण्याच्या विचार करत आहे. आयसीसीच्या स्पर्धांसाठी सध्या २५ जणांच्या चमूला परवानगी आहे. ती कमी करून २३ वर आणण्याची आयसीसीची तयारी आहे.
आयसीसी कशामुळे हा नियम करू इच्छित आहे -
आयसीसी स्पर्धेचे यजमानपद भूषवणाऱ्या देशावर संघांच्या राहण्या-खाण्याचा खर्चाचा भार पडत असल्याने आयसीसीने हा नवा नियम आणला आहे.
कोणाला बसणार याचा फटका -
भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यासारख्या मोठ्या संघांना याचा फटका बसणार आहे.
२०१५ च्या विश्वकरंडक स्पर्धेत महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने १६ वा खेळाडू म्हणून धवन कुलकर्णीला सोबत नेलं होतं. गतवर्षी झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत ऋषभ पंत हा काही काळ अनऑफिशियल सदस्य होता. शिखर धवनच्या दुखापतीनंतर त्याचा संघात समावेश करण्यात आला.
भारतीय संघ २८ सदस्यांसह न्यूझीलंड दौऱ्यावर -
भारतीय संघ २८ सदस्यांसह न्यूझीलंड दौऱ्यावर असून यात १५ खेळाडू, ४ प्रशिक्षक, २ नेट्समध्ये सरावासाठी स्पेशालिस्ट, १ ट्रेनर, १ फिजीओ, २ मसाजर, १ व्यवस्थापक, १ मीडिया मॅनेजर आणि १ लॉजिस्टीक मॅनेजर यांचा समावेश आहे.
हेही वाचा - अंडर-१९ विश्वचषक : भारतावर मात करत बांगलादेशने पहिल्या-वहिल्या विश्वकरंडकावर कोरले नाव
हेही वाचा - VIDEO : क्रिकेटला गालबोट, अंतिम सामन्यानंतर भारत-बांगलादेशचे खेळाडू एकमेकांना भिडले