दुबई - टी-२० क्रिकेटची लोकप्रियता पाहून कसोटी क्रिकेट धोक्यात आल्याची चर्चा होत आहे. कसोटी क्रिकेट वाचविण्यासाठी आयसीसीने त्यांच्या जुन्या नियमात शुक्रवारी बदल केला आहे. एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटप्रमाणे आता कसोटी क्रिकेटमध्येही खेळाडूंच्या जर्सीवर नाव आणि क्रमांक लिहिण्याची परवानगी दिली आहे.
इंग्लंड वेल्स क्रिकेट बोर्डाने अॅशेश मालिकेत खेळाडूंच्या जर्सीवर नाव आणि क्रमांक लिहिण्याची मागणी केली होती. त्याला आयसीसीने मंजुरी दिली आहे. हा नवा नियम १ ऑगस्ट २०१९ पासून लागू होईल.
नुकतेच आयसीसीने कसोटी चॅम्पियनशिपचेही आयोजन केले आहे. ज्याची सुरुवात १५ जुलैपासून होईल. आणि या कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना २०२१ मध्ये होईल. आयसीसी कसोटी क्रिकेटकडे प्रेक्षक खेचून आणण्यासाठी हे नवे बदल करत आहे.