दुबई - आगामी २०२१ सालामध्ये होणारा टी-२० विश्वकरंडक हा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे भारतामध्येच होणार आहे. आयसीसीच्या प्रवक्त्यांनी याची माहिती दिली. या विश्व करंडकाचे आयोजन २०२१ च्या ऑक्टोबर-नोव्हेंबर या महिन्यादरम्यान करण्यात येणार आहे.
आयसीसीने काय म्हटलं...
सध्याच्या घडीला २०२१ चा टी-२० विश्वकरंडक हा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होईल. याचे आयोजन ठरल्याप्रमाणेच भारतातच केले जाणार आहे.
१६ संघ होणार सहभागी -
२०२१ साली होणाऱ्या विश्वकरंडकात १६ संघ सहभागी होणार आहेत. भारत, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, इंग्लंड, आयर्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडिज याव्यतिरीक्त पापुआ न्यू गिनी, नामिबीया, नेदरलँड, ओमान आणि स्कॉटलंड हे संघही या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
ऑस्ट्रेलियात २०२० साली होणारा टी-२० विश्वकरंडक कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आला होता. त्यामुळे २०२० ऐवजी २०२२ सालच्या स्पर्धेचे यजमानपद हे ऑस्ट्रेलियाला मिळणार असल्याचे आयसीसीने याआधीच स्पष्ट केले होते.
हेही वाचा - Ind Vs Aus : शास्त्री गुरुजींसह टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना; BCCI ने पोस्ट केले खास फोटो
हेही वाचा -धोनीची पोल्ट्री उद्योगात एंट्री; पाळणार 'कडकनाथ' कोंबड्या