नवी दिल्ली - लॉकडाऊन कालावधीत सोशल मीडियावर बराच अक्टिव्ह झालेला युझवेंद्र चहलने लॉकडाऊन संपल्यावर घरीच परतणार नसल्याचे म्हटले आहे. कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण भारतात लॉकडाऊन सुरू आहे. चहल प्रमाणे सर्व क्रिकेटपटू २५ मार्चपासून घरी आहेत.
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार लेगस्पिनर युझवेंद्र चहल म्हणाला, की लॉकडाऊन दरम्यान घरात असताना मी थकलो आहे आणि लॉकडाउन उघडल्यानंतर मी घरी येणार नाही. पुढच्या तीन वर्षांपेक्षाचा जास्त कालावधी मी घरात घालवला आहे. आणि आता मी हे सहन करू शकत नाही. मी जवळच्या हॉटेलमध्येच राहेन पण घरी येणार नाही.
तो म्हणाला, की ज्या दिवशी लॉकडाउन काढून टाकले जाईल, तो मैदानात जाईल आणि तेथे किमान एक चेंडू फेकून येईन.