नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराटने आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर बंगळुरू (आरसीबी) संघ भविष्यात न सोडण्याचे म्हटले आहे. त्याने या संघासाठी आयपीएलचे जेतेपद जिंकण्याची इच्छा व्यक्त करून दाखवली आहे. आरसीबीला आयपीएलचे एकदाही विजेतेपद पटकावता आलेले नाही.
संघसहकारी आफ्रिकेचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सशी केलेल्या बातचीतमध्ये विराटने ही इच्छा व्यक्त केली. तो म्हणाला, “१२ वर्षाचा हा प्रवास आश्चर्यकारक होता. विजेतेपद हे आपल्या संघाचे लक्ष्य आहे आणि ते आपल्या सर्वांचे स्वप्न आहे. फ्रेंचायझीच्या प्रेमापोटी आणि काळजीपोटी मी संघाला सोडून जाण्याच्या विचारात नाही.”
आरसीबीसाठी विराटने १७७ सामने खेळले असून त्याने ५४१२ धावा केल्या आहेत. आयपीएलच्या २०१६ च्या हंगामात विराटने ऑरेंज कॅप पटकावली होती. त्याने ४ शतके आणि ७ अर्धशतकांसह ९७३ धावा ठोकल्या होत्या.