नवी दिल्ली - पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. आफ्रिदीचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून जेव्हा त्याने आपल्या मुलीला आरती करताना पाहिले तेव्हा त्याने घरी टीव्ही फोडल्याची कबुली दिली.
हेही वाचा - आठवड्यापूर्वी निवृत्तीची घोषणा केलेला फिलँडर आता 'या' संघाकडून खेळणार
पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरियाला हिंदू असल्यामुळे संघात वेगळी वागणूक मिळत असल्याचे मत शोएब अख्तरने मांडले होते. त्यानंतर कनेरियाबद्दल अनेक मतमतांतरे क्रिकेविश्वात उमटली गेली. संघात असा भेद नसल्याचे माजी कर्णधार इंझमाम उल हकने स्पष्ट केले. त्यानंतर हा व्हायरल झालेला आफ्रिदीचा व्हिडिओ हिंदू-मुस्लीम वादात भर टाकत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
या व्हिडिओमध्ये आफ्रिदीने एका भारतीय वाहिनीचा उल्लेख केला आहे. 'ही वाहिनी मी माझ्या पत्नीला मुलांसोबत नव्हे तर एकटे पाहण्यास सांगितली होती. मात्र, मी माझ्या मुलीला या वाहिनीवरील कार्यक्रमादरम्यान 'आरती'चे अनुकरण करताना पाहिले आणि मी टीव्हीच फोडून टाकला', असे आफ्रिदीने या व्हिडिओत म्हटले आहे.
-
Here Shahid Afridi is making fun of the Hindu ritual of Aarti and everyone’s enjoying but remember how he tweeted on the plight of Uighar muslims just two days ago and everyone forced him to delete? Islam is just an excuse to hide poverty in Pakistanpic.twitter.com/PyXV9e8QkC
— Monica (@TrulyMonica) December 28, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Here Shahid Afridi is making fun of the Hindu ritual of Aarti and everyone’s enjoying but remember how he tweeted on the plight of Uighar muslims just two days ago and everyone forced him to delete? Islam is just an excuse to hide poverty in Pakistanpic.twitter.com/PyXV9e8QkC
— Monica (@TrulyMonica) December 28, 2019Here Shahid Afridi is making fun of the Hindu ritual of Aarti and everyone’s enjoying but remember how he tweeted on the plight of Uighar muslims just two days ago and everyone forced him to delete? Islam is just an excuse to hide poverty in Pakistanpic.twitter.com/PyXV9e8QkC
— Monica (@TrulyMonica) December 28, 2019
आफ्रिदी हिंदू चालीरीतींची खिल्ली उडवत असल्याची मते अनेकांनी व्यक्त केली असून या व्हिडिओमुळे तो टीकेचा धनी ठरत आहे.