वेलिंग्टन - भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्यांच्या मालिकेला २१ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी, न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट संघात परतला असून त्याने कोहलीला बाद करण्यासंबंधी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा - VIDEO : "एकमेकांचे कांदे-बटाटे खाऊ शकतो, तर क्रिकेट का खेळू शकत नाही?"
'विराट शानदार खेळाडू आहे. तो महान असल्याचे सर्वांनाच माहित आहे. विराटसारख्या खेळाडूंना बाद करण्यासाठी आणि स्व:ताला सिद्ध करण्यासाठी मी नेहमी खेळतो. बेसिन रिजर्व्हची खेळपट्टी मला आवडते. हा आठवडा चांगला असणार आहे. कसोटी खेळण्यासाठी मी वाट पाहत आहे', असे बोल्टने सामन्यापूर्वी म्हटले.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात बोल्टच्या हाताला दुखापत झाली होती. त्यामुळे तो भारताविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी -२० मालिकेला मुकला होता. आयसीसीच्या ताज्या एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुसर्या स्थानावर घसरला. ट्रेंट बोल्टने त्याला मागे टाकत अव्वल स्थान मिळवले आहे.