ETV Bharat / sports

अश्विनला दबाव निर्माण करण्याची संधी दिली, स्मिथची कबुली - स्टिव्ह स्मिथ

भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू गोलंदाज रविचंद्रन अश्विन याला सामन्यात दबाव निर्माण करण्याची संधी दिली असल्याची कबुली ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टिव्ह स्मिथने दिली.

I gave Ashwin a chance to pressure, it has never happened before says Smith
अश्विनला दबाव निर्माण करण्याची संधी दिली, स्मिथची कबुली
author img

By

Published : Dec 29, 2020, 4:58 PM IST

मेलबर्न - भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू गोलंदाज रविचंद्रन अश्विन याला सामन्यात दबाव निर्माण करण्याची संधी दिली असल्याची कबुली ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टिव्ह स्मिथने दिली. माझ्या कारकिर्दीमध्ये कोणत्याही फिरकीपटूला याआधी मी असा दबाव निर्माण करण्याची संधी दिली नव्हती, असे देखील स्मिथने सांगितले.

भारताविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत स्मिथला आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी करता आलेली नाही. अशात भारतीय संघाने दुसरा कसोटी सामना ८ गडी राखून जिंकत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. दुसरा सामना संपल्यानंतर स्मिथ म्हणाला की, मी अश्विनच्या गोलंदाजीचा सामना ज्या प्रकार करायला हवा होता, त्या पद्धतीने करू शकलो नाही. मला अश्विनवर दबाव निर्माण करायला हवे होते. पण झाले उलट अश्विनला मी दबाव निर्माण करण्याची संधी दिली. याआधी मी अशी संधी कोणत्याही गोलंदाजाला दिली नव्हती.

दुसरीकडे अश्विनने सांगितले की, स्मिथ विरोधात खास रणणिती आखत गोलंदाजी केली. ऑस्ट्रेलियामध्ये खेळताना जर तुम्ही स्मिथला बाद करू शकला नाही तर तुम्हाला अडचणीत वाढ होते. तो फलंदाजीमध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावतो. स्मिथ मोठी खेळण्यासाठी उत्सुक आहे. पण ते यावर्षी होऊ शकले नाही.

भारताची मालिकेत बरोबरी -

मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर रंगलेल्या 'बॉक्सिंग डे' कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाला ८ गड्यांनी नमवत पहिल्या पराभवाचा वचपा काढला आहे. अंजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाला चौथ्या दिवशी ७० धावांचे आव्हान मिळाले होते. या धावांचा पाठलाग करताना भारताने सलामीवीर मयांक अगरवाल आणि चेतेश्वर पुजाराला गमावले. पण, शुबमन गिल आणि अजिंक्य रहाणेने विजयावर शिक्कामोर्तब केले. गिलने ७ चौकारांसह ३५ तर रहाणेने ३ चौकारांसह २७ धावा केल्या. या विजयामुळे भारताने 'बॉर्डर-गावसकर' कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. पहिल्या डावात शतकी खेळी साकारणाऱ्या अजिंक्यला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

हेही वाचा - भारताच्या विजयाकडे एक उदाहरण म्हणून पहिलं जाईल - रवी शास्त्री

हेही वाचा - रोहित संघात दाखल होण्यास सज्ज; 'या' खेळाडूला डच्चू मिळण्याची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.