हैदराबाद - हैदराबादच्या संघाने पंजाबवर ४५ धावांनी विजय मिळवला आहे. डेव्हिड वॉर्नरच्या ८१ धावांच्या खेळीच्या बळावर हैदराबादने पंजाबपुढे २१३ धावांचे आव्हान ठेवले होते. पण राहुलच्या (७९) अर्धशतकाच्या जोरावर पंजाबचा संघ ८ बाद १६७ धावांपर्यंतच मजल मारू शकला. रशीद आणि खलीलने ३-३ बळी टिपले. पंजाबचा हा गेल्या सहा सामन्यातील पाचवा पराभव ठरला.
पंजाबकडून मोहम्मद शमी आणि आर. अश्विनने यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. पंजाबने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादच्या सलामी जोडीने ७८ धावा काढल्या. साहा २८ धावा काढून बाद झाला. त्यानंतर डेव्हिड वॉर्नरने ५६ चेंडूत ८१ धावांचे योगदान दिले. मनीष पांडेने ३६ धावांचे योगदान दिले. त्यानंतर मोहम्मद नबी २० तर केन विलियमसन यांने १४ धावांची भर घातली. पंजाबकडून अर्शदीप सिंग आणि एम. अश्विनने प्रत्येकी १ गडी बाद केला.