मुंबई - कोरोना विषाणू लवकरच आटोक्यात येईल आणि आयपीएलचा थरार आपल्याला पुन्हा पाहता येईल, अशी आशा कोलकाता नाइट रायडर्स संघाचा सहमालक आणि बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानने व्यक्त केली आहे. त्यानं बीसीसीआयच्या बैठकीनंतर ट्विटव्दारे आपलं मत व्यक्त केलं.
कोरोना विषाणूच्या फैलावामुळे जगभरातील अनेक स्पर्धा रद्द तसेच काही स्पर्धेचे आयोजन लांबणीवर टाकण्यात येत आहे. बीसीसीआयनेही २९ मार्चपासून सुरू होणारी इंडियन प्रिमीअर लीग स्पर्धा पुढे ढकलली असून ही स्पर्धा १५ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आज या विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी बीसीसीआयने एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला स्पर्धेत भाग घेणाऱ्या संघाच्या संघमालकांनाही उपस्थित राहण्यास सांगितलं होतं. केकेआर संघाचा सहमालक शाहरुखही या बैठकीला हजर होता.
बीसीसीआयच्या बैठकीनंतर शाहरुख खानने एक ट्विट केले आहे. त्यात तो म्हणतो, 'मैदानाबाहेर सगळ्या संघाच्या सहमालकांना भेटून आनंद झाला. चाहते, खेळाडू तसेच शहराची सुरक्षा याचे महत्व सगळ्यात पहिलं आहे. आपल्याला आरोग्य संस्था तसेच सरकारच्या सूचनांचे पालन करणे, आवश्यक आहे.'
पुढील काही दिवसांमध्ये कोरोना विषाणूचा प्रभाव कमी होईल आणि आपल्याला आयपीएलचा थरार अनुभवता येईल. सरकार, बीसीसीआय तसेच सर्व संघाचे सहमालक परिस्थितीवर नजर ठेऊन आहेत, असेही शाहरुख म्हणाला.
-
2/2. Hope the spread of the virus subsides & the show can go on. BCCI & team owners in consultation with the govt will keep a close watch & decide the way fwd in the health interest of ever1. Lovely 2 meet every1 & then sanitise ourselves repeatedly..@SGanguly99 @JayShah #BPatel
— Shah Rukh Khan (@iamsrk) March 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">2/2. Hope the spread of the virus subsides & the show can go on. BCCI & team owners in consultation with the govt will keep a close watch & decide the way fwd in the health interest of ever1. Lovely 2 meet every1 & then sanitise ourselves repeatedly..@SGanguly99 @JayShah #BPatel
— Shah Rukh Khan (@iamsrk) March 14, 20202/2. Hope the spread of the virus subsides & the show can go on. BCCI & team owners in consultation with the govt will keep a close watch & decide the way fwd in the health interest of ever1. Lovely 2 meet every1 & then sanitise ourselves repeatedly..@SGanguly99 @JayShah #BPatel
— Shah Rukh Khan (@iamsrk) March 14, 2020
दरम्यान, चीनपासून सुरुवात झालेल्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. या विषाणूमुळे जगभरातील ५ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १०० हून अधिक देशांमध्ये याचा फैलाव झाला आहे. भारतात ८२ हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून आरोग्य आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे.
हेही वाचा - फुटबॉलपटू रोनाल्डोच्या मित्राला कोरोनाने ग्रासले
हेही वाचा - IPL पेक्षा लोकांचा जीव महत्वाचा, किंग्ल इलेव्हन पंजाबच्या सहमालकाचे वक्तव्य