ETV Bharat / sports

वेस्ट इंडिजने श्रीलंकेला पहिल्या डावात 169 धावात गुंडाळले, होल्डरने घेतले पाच बळी

दिवभराचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडिजने बिनबाद 13 धावा केल्या असून जॉन कॅम्पबेल आणि क्रेग ब्रेथवेट ही सलामीची जोडी खेळत आहे.

holder-takes-five
holder-takes-five
author img

By

Published : Mar 22, 2021, 11:33 AM IST

अँटीगुआ - वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचा डाव संपला. यावेळी श्रीलंकेचा पहिला डाव 169 धावांवर संपुष्टात आला. तर वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरने 5 बळी घेतले.

सलामीची जोडी मैदानात-

दिवभराचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडिजने बिनबाद 13 धावा केल्या असून जॉन कॅम्पबेल आणि क्रेग ब्रेथवेट ही सलामीची जोडी खेळत आहे.

श्रीलंकेची सुरुवात खराब -

वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून श्रीलंकेला प्रथम फलंदाजी दिली. सलामीवीर कॅम्पबेल आणि ब्रॅथवेट यांनी विकेट गमावणार नाही याची खात्री करुन घेतली आणि सर्व विकेट्स राखून ठेवल्या. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेची सुरूवात खराब झाली. दिमुथ करुणारत्ने हा 11 व्या षटकात 12 धावांवर बाद झाला. त्यानंतर लाहिरू थिरिमाने हा ओशादा फर्नांडोच्या जोडीला आला. पण त्यांचीही जोडी शेवटपर्यंत टिकू शकली नाही, कारण ओशादा धावबाद झाला. नंतर दिनेश चंडीमल मैदानात आला. पण चंडीमलही बाद झाला.

दमदार कामगिरीला चंडीमलला अपयश -

चंडीमलही दमदार कामगिरी करू शकला नाही. त्याने जेसन होल्डरच्या चेंडूवर फक्त चार धावा काढल्या. अन्य फलंदाजही धावा करण्यास अपयशी ठरले. मात्र, थिरिमाने याने शानदार कामगिरी बजावली आणि वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनाही चांगलेच नमविले.

याने सावरला श्रीलंकेचा डाव -

श्रीलंकेच्या धडाधड विकेट्स जाऊ लागल्या. पण थिरिमानेच्या अर्धशतकामुळे श्रीलंकेला 100 धावांचा टप्पा गाठता आला. निरोशन डिकवेला आणि थिरिमाने या दोघांनी श्रीलंकेचा डाव पुन्हा सावरला आणि सावधपणे खेळी केली. होल्डरने डिकवेला याला बाद केले. पण त्यापूर्वी डिकवेलाने 32 धावांची खेळी केली. त्यानंतर, होल्डरने थिरिमानेला (70) बाद केले आणि त्याच्या बाजूने आवश्यक असणारी विकेट घेतली. यानंतर श्रीलंकेने एकापाठोपाठ विकेट गमावल्या आणि 169 धावांवर संघ बाद झाला.

हेही वाचा - सचिनच्या नेतृत्वात इंडिया लेजंड्सने जिंकली 'रोड सेफ्टी सीरीज'

दरम्यान, जेसन होल्डरने या डावात पाच विकेट्स घेतल्या, तर केमर रोचने तीन गडी बाद केले.

संक्षिप्त स्कोअर : श्रीलंका 169- (लाहिरू थिरिमाने- 70, निरोशन डिकवेला- 32, जेसन होल्डर 5/27); वेस्ट इंडिज 13/0 (जॉन कॅम्पबेल 7*, क्रेग ब्रेथवेट 3*).

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.