डरबन - श्रीलंकेविरुध्दच्या अखेरच्या २ सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिकन संघात हाशिम आमला, एडिन मार्करम आणि जे. पी. ड्यूमिनी या खेळाडूंना परत बोलवण्यात आले आहे. तर रिजा हेंड्रिक्स आणि वियान मुल्डर यांना संघातून बाहेर करण्यात आले आहे. अष्टपैलू क्रिकेटपटू ड्यूमिनी साडेचार महिन्यानंतर संघात परतत आहे. तर मार्करमला स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्याने संघात स्थान देण्यात आले आहे.
५ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिले ३ सामने जिंकून दक्षिण आफ्रिकेने ही मालिका आपल्या नावावर यापूर्वीच केली आहे. या मालिकेतील चौथा वनडे सामना पोर्ट एलिझाबेथ येथे १३ मार्चला सेंट जॉर्जेस ओव्हल मैदानावर खेळण्यात येईल. तर अखेरचा सामना १६ मार्चला केप टाउन येथे खेळविला जाईल.
दक्षिण आफ्रिकेचा एकदिवसीय संघ
फाफ-डु प्लेसिस (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), डेविड मिलर, लुंगी एंगिडी, इमरान ताहिर, एनरिच नॉर्टजे, अंदिले फेहलुकवायो, ड्वाइन प्रीटोरियस, कंगिसो रबाडा, तबरेज शम्सी, डेल स्टेन, रस्सी वॅन डेर ड्यूसेन, हाशिम आमला, एडिन मार्करम, जे. पी. ड्यूमिनी.