मुंबई - चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. आतापर्यंत ३१ लाखांहून अधिक रुग्ण आणि २ लाखांपेक्षा अधिक बळी या कोरोना विषाणूने घेतले आहेत. भारतामध्येही कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. अशात भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगने, एक फोटो शेअर करताना, कोरोना देखील बुचकळ्यात सापडू शकतो, असे म्हटले आहे.
हरभजनने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये एका मुलाचे केस कापले जात आहेत. या मुलाचा एक अनोखा हेअरकट फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. या मुलाच्या डोक्याच्या मागच्या बाजूवर हा हेअरकट करण्यात आला आहे. या हेअरकटमध्ये डोळे, नाक, तोंड सारे काही दिसत आहे.
हरभजनने या अनोख्या फोटोला, हा हेअरकट पाहून कोरोनाही बुचकळ्यात पडेल की, नेमके शरीरात शिरायचे कुठून.., असे मजेशीर कॅप्शन दिले आहे. भज्जीच्या या अनोख्या फोटोवर चाहत्यांनी कमेंट आणि लाईकच्या रूपाने भरभरुन प्रतिसाद दिला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दरम्यान, कोरोनामुळे जगभरातील जवळपास सर्व स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामुळे खेळाडू आपापल्या घरी कुटुंबियासोबत वेळ घालवत आहेत. अनेक खेळाडूंनी कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी आर्थिक मदत देऊ केली आहे. हरभजननेही लॉकडाऊनमध्ये सापडलेल्या गरजू लोकांना मदतही केली आहे. त्याने गरजूंना अन्न-धान्य पुरवण्याचे काम केले आहे.
हेही वाचा - ''तू कोरोनापेक्षा वाईट'', माजी कर्णधारावर ख्रिस गेलचा गंभीर आरोप
हेही वाचा - भारताने आकारलेले शुल्क न भरल्याने, यजमानपद गमावले; झाला 'इतका' दंड