ETV Bharat / sports

पोलिसांना मारहाण करणाऱ्यांवर भडकला भज्जी, म्हणाला...

author img

By

Published : Mar 28, 2020, 9:50 AM IST

हरभजनने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत, पोलिसांना काही जण मिळून मारहाण करताना दिसत आहेत. तसेच काही लोक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. यावर हरभजन म्हणतो, पोलिसांबद्दलचा आपला व्यवहार बदलण्याची गरज आहे. आपल्या सुरक्षेसाठी ते स्वत: चे आयुष्य पणाला लावून दिवस-रात्र रस्त्यावर फिरत आहेत.

Harbhajan Singh slams people disregarding police orders during 21-day coronavirus lockdown
पोलिसांना मारहाण करणाऱ्यांवर भडकला भज्जी, म्हणाला...

मुंबई - कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात, २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. देशातील बहुतांश जनता घरीच थांबली आहे. पण काही जण मात्र लॉकडाऊनचे पालन करत नाहीत, अशा लोकांना भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने फटकारले आहे.

हरभजनने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत, पोलिसांना काही जण मिळून मारहाण करताना दिसत आहेत. तसेच काही लोक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. यावर हरभजन म्हणतो, पोलिसांबद्दलचा आपला व्यवहार बदलण्याची गरज आहे. आपल्या सुरक्षेसाठी ते स्वत:चे आयुष्य पणाला लावून दिवस-रात्र रस्त्यावर फिरत आहेत.

  • We have to change our fucking attitude towards police.don’t forget they are putting their life to save ours.they also have families but they r doing their duty for the nation..why can’t we all just stay at home and be sensible for once for better tomorrow. Plz be sensible 😡😡😡 pic.twitter.com/lEXD0LJSgM

    — Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) March 26, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पुढील काही दिवस महत्त्वाचे असून यासाठी लॉकडाऊन यशस्वी होणे गरजेचे आहे. यासंदर्भात देशाच्या पंतप्रधानांपासून ते सिनेस्टार आणि खेळाडू वारंवार आवाहन करत आहे. असे असताना देखील काही जण रस्त्यावरून फिरत आहे. अशा लोकांवर पोलिस कारवाई करत आहे.

कोरोना विषाणू बाधीत रुग्णांच्या संख्येत दिवसांगणिक वाढ होत आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार भारतातील करोनाग्रस्तांची संख्या ८३४ झाली आहे. तर आत्तापर्यंत १९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात देभशरात ७५ रुग्ण वाढले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

हेही वाचा - Coronavirus : हिटमॅन रोहित म्हणतो, आधी देश महत्त्वाचा, आयपीएलचा विचार नंतर...

हेही वाचा - 'कर्फ्यू काळात मजा-मस्तीसाठी रस्त्यावर उतरणे, याला देशाशी प्रामाणिक राहणे म्हणत नाहीत'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.