ETV Bharat / sports

मर्यादेत राहा, मोदींवर टीका करणाऱ्या आफ्रिदीला हरभजनने सुनावलं

काश्मीरच्या मुद्द्यावरून पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग आफ्रिदीवर चांगलाच भडकला असून त्याने भारत आणि मोदी यांच्याविरोधात बोलायचा हक्क आफ्रिदीला कोणी दिला, असा सवाल केला आहे.

Harbhajan Singh says No relationship with Shahid Afridi from now
मर्यादेत राहा, मोदींवर टीका करणाऱ्या आफ्रिदीला हरभजनने सुनावलं
author img

By

Published : May 17, 2020, 8:13 PM IST

मुंबई - काश्मीरच्या मुद्द्यावरून पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग आफ्रिदीवर चांगलाच भडकला असून त्याने भारत आणि मोदी यांच्याविरोधात बोलायचा हक्क आफ्रिदीला कोणी दिला, असा सवाल केला आहे.

हरभजनने एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं की, 'आफ्रिदीला मी यापूर्वी माझा मित्र समजत होतो. पण आता त्याने भारत आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली. यामुळे त्याचे आणि माझे सर्व संबंध संपले आहेत. मोदींवर टीका करण्याचा अधिकार आफ्रिदीला कोणी दिला.'

मी भारतीय आहे आणि भारतीय म्हणूनच मरणार आहे. मी देशासाठी २० वर्ष क्रिकेट खेळलो आहे. मला देशभक्ती दाखवण्यासाठी कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. आफ्रिदीने जे कृत्य केलं आहे. ते चूकीचं आहे. त्याने भारत आणि पंतप्रधान मोदी यांच्याविषयी काहीही बोललं तर आम्ही सहन करुन घेणार नाही. इतकेच नव्हे तर त्याने कोणत्याही भारतीयांविषयी काही चूकीच बोललं तरीही आम्ही खपवून घेणार नाही. त्याने मर्यादेत राहून बोलावं, असेही हरभजन म्हणाला.

दरम्यान, हरभजन यांच्यासह भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरनेही आफ्रिदीला सुनावले आहे. गंभीरने त्याच्या ट्विटमध्ये पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर बाजवा यांच्यावर निशाणा साधला आहे. गंभीरने आफ्रिदी, इम्रान खान, बाजवा यांचा उल्लेख जोकर असा केला आहे. हे तिघे मोदी यांच्याबद्दल विष पसरवण्याचा काम करत आहेत. यातून ते पाकच्या लोकांना मूर्ख बनवत आहेत, पण निर्णय येईपर्यंतही काश्मीर तुम्हाला मिळणार नाही. बांगलादेश लक्षात आहे ना? असेही म्हटलं आहे.

आफ्रिदीने काय म्हटलं?

आफ्रिदीने काश्मीर प्रश्नावरुन नरेंद्र मोदी घाबरट माणूस असल्याचे वक्तव्य केलं आहे. मोदींनी काश्मीरमध्ये भारताचे सात लाख सैनिक तैनात केले आहेत. इतके सैनिक आमच्या संपूर्ण पाकिस्तानच्या सैन्यात आहेत. परंतु त्यांना हे माहित नाही की, त्या ७ लाख सैनिकांच्या मागे पाकची २२-२३ कोटी जनता सैन्यरुपी उभी आहे. आम्ही आमच्या पाकिस्तानी सैन्यासोबत आहोत, असेही आफ्रिदीने म्हटले होते.

हेही वाचा - “मुलाला वडिलांना परत कधी पाहता येईल?”, सानियाने व्यक्त केली चिंता

हेही वाचा - ...तरीही मागील ७० वर्षांपासून काश्मीरची भीक मागत आहात, गंभीरने आफ्रिदीला सुनावले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.